31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयनितेश राणे यांचे उखळ पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही- खासदार विनायक राऊत

नितेश राणे यांचे उखळ पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही- खासदार विनायक राऊत

टीम लय भारी

सिंधुदुर्ग :म्याऊ म्याऊ करून चिडवणे हा सिंधुदुर्गचा अपमान आहे. कोकणची संस्कृती अशी नाही. नितेश राणेंचा तो बालिशपणा.या कोकणाने आदर्श परंपरा निर्माण केली आहे त्याचे भान म्याव म्याव करणाऱ्यांनी राखायला हवं होतं. अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.तसेच किरण सामंत विरुद्ध विनायक राऊत हा नसलेला वाद आमदार नितेश राणे यांनी लावलेला जावईशोध आहे. स्वतः करायचे आणि त्याचे खापर इतरांवर फोडायचे हा नितेश राणे यांचा पूर्वीपासूनचा धंदा आहे. संतोष परब हल्लाप्रकरणी पोलीस खऱ्या आरोपीला लवकरच समोर आणतील त्यावेळी नितेश राणे यांचे उखळ पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही. असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला(Vinayak Raut has given a warning to Nitesh Rane)

ओमायक्रॉनमुळे केंद्र आणि राज्य सरकारने सभांवर, राजकीय कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. त्यातलाच तो प्रकार आहे त्यामुळे त्याच्यात वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही. अशी प्रतिक्रिया जेपी नड्डा यांच्या दौऱ्यावर खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. तसेच कणकवलीत संतोष परब या शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्यात पुणे येथील एका नेत्याच्या मॉलचा कर्मचारी होता, योग्यवेळी त्या नेत्याचे नाव जाहीर करणार, पोलिसांनी पडताळणी करावी असेही विनायक राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत यांचे विधानसभेसाठी भाजपला आव्हान

बेळगावातील मराठी बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही : उदय सामंत

ते पुढे म्हणाले, स्वतःच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडायची ही विकृती नारायण राणे यांच्या घराण्याने निर्माण केली आहे. ती शिवसेनेने केलेली नाही. शिवसैनिक स्वतःच्या कार्यकर्त्याचे रक्त कदापिही सांडत नाहीत. तर शिवसैनिक हा स्वतःच रक्त देऊन इतरांचे जीव वाचवतो. सत्यविजय भिसे, रमेश गोवेकर, अंकुश राणे या घटनांचा संदर्भ देत खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर यावेळी  टीका केली.

आदित्य ठाकरे यांच्यावर ‘म्याव’ टोमणे मारण्यास शिवसेनेचा आक्षेप, विधान परिषदेने मागितला घटनेचा अहवाल

Shiv Sena objects to ‘meow’ taunt against Aaditya Thackeray, legislative council seeks report on incident

देवेंद्र फडणवीस यांना एक माहिती असायला हवी होती,gst लागू झाल्यानंतर इंधनावरील टॅक्स हा राज्यसरकरचा उत्पनाचा एकमेव मार्ग राहिला आहे. आणि त्याच्यावर जर राज्य सरकारने कपात करायची असेल तर महाराष्ट्र सरकारचे केंद्र सरकारकडे 56 हजार कोटी रुपये आहेत. त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करावेत. महानगरपालिकांचे साडेचार हजार कोटी केंद्राकडून यायचे आहेत. असे एकूण 60 हजार कोटी रुपये येणं आहे,ते दिलं गेलं तर यावर विचार करता येईल. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी