29.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयराज्यातील भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे : नाना पटोले

राज्यातील भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे : नाना पटोले

टीम लय भारी

मुंबई : देशात कोरोना काँग्रेसने पसरविल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केला. यावर आता काँग्रेसकडून प्रत्यूत्तरे सुरु झाली आहेत. गोव्यात काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी कोरोना काळात मोदींनी देशाला वाऱ्यावर सोडले होते. लोकांना अन्न, जाण्यासाठी वाहने नव्हती. मोदींना काय वाटत होते? असा सवाल केला. तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींनी आपले पाप झाकण्यासाठी काँग्रेसचे नाव घेतल्याचा आरोप केला आहे(Nana Patole said, BJP leaders should apologize to Maharashtra).

देशभरात कोरोना पसरवण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेसने केल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसेभत केले होते. त्यानंतर देशभरातील आणि राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. दरम्यान, मोदींच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाल्याचे सांगत बुधवारपासून काँग्रेसतर्फे भाजपच्या प्रत्येक कार्यालयासमोर ‘माफी मांगो’ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपच्या सर्व कार्यालयासमोर आम्ही उद्यापासून महाराष्ट्राची माफी मागावी असे फलक घेऊन उभे राहणार आहोत, असे पटोले म्हणाले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत डब्ल्यूएचओने सांगितलेले जर पाळले असते तर देशावर ही परिस्थिती आली नसती. उत्तर प्रदेशमध्ये प्रेतांचा खच पडला होता, ते पाप झाकण्याचा प्रयत्न आज नरेंद्र मोदी यांनी केला, असे प्रत्युत्तर नाना पटोलेंनी दिले. मोदी दरवेळी काँग्रेसचे नाव घेतात आणि निवडून येतात, असे किती दिवस चालणार? असा सवालही त्यांनी केला(Today, Narendra Modi tried to cover up his sins, replied Nana Patole).

हे सुद्धा वाचा 

मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच उगवले : नाना पटोले

असंवेदनशील, अहंकारी व शेतक-यांचा मारेकरी पंतप्रधान म्हणून इतिहासात मोदींची नोंद होईल – नाना पटोले

दलालांचा ठेकेदार भारतीय जनता पक्षाने काँग्रेसकडे बोट करू नये! : नाना पटोले

BJP demands Lata Mangeshkar memorial at Shivaji Park, Congress backs it

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होते तेव्हा विरोधकांच्या आरोपांचे खंडन करून सरकारने काय केले हे सांगायचे असते. एकमेकांची खिल्ली उडवायची नसते. तातडीने लॉकडाऊन लावला तेव्हा हजारो लोकं चालत गेले, अनेकांचा जीव गेला. भाजपचे राज्यातील नेते समर्थन करत असतील तर ते महाराष्ट्र द्रोही असल्याचे पटोले म्हणाले. गुजरातमधून १ हजार ३३ श्रमिक ट्रेन सोडल्या तर महाराष्ट्रातून ८०० ट्रेन सोडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गुजरातमध्ये भूकंप आला तेव्हा महाराष्ट्राने सगळ्यात जास्त मदत केली. महाराष्ट्राने बाहेरून आलेल्या अनेकांना महाराष्ट्राने मोठं केले आहे. राज्यातील भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. असे ही ते म्हणाले.

पहिल्या लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे पालन करत होता. काँग्रेसवाले ही परिस्थिती कशी बिघडेल याची वाट पाहत होते. जेव्हा डब्ल्यूएचओ सांगत होते की लोकांनी आहे तिथेच थांबावे, जगाला हा संदेश दिला जात होता. परंतू काँग्रेसने तेव्हा हद्द पार केली, महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, असा गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. दिल्लीतही गाड्यांवर माईक लावून लोकांना त्यांच्या त्यांच्या घरी जाण्यासाठी सांगितले जात होते, असा आरोप मोदी यांनी केला. मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर लोकसभेत उत्तर देत होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी