31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
HomeसंपादकीयDevendra Fadanvis : फडणवीसजी, आपण इतके कसे महाराष्ट्रद्वेषी ?

Devendra Fadanvis : फडणवीसजी, आपण इतके कसे महाराष्ट्रद्वेषी ?

ॲड. विश्वास काश्यप

आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ,

जय गुजरात !

साहेब ( Devendra Fadanvis ), ‘जय गुजरात’ने पत्राची सुरुवात करतोय. माफ करा. पण करणार काय ? आपण गुजराती भक्त आहात हे गेली साडे पाच वर्षे वेळोवेळी आपण सिद्ध करीत आहात. महाराष्ट्राबद्दल आपले प्रेम आम्हाला कधीही दिसले नाही. मुळात महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याचे आपण मुख्यमंत्री झालात ते त्या दोन गुजरात्यांच्या मेहेरबाणीमुळे.

महाराष्ट्राच्या प्रती असलेला आपला ( Devendra Fadanvis ) स्वाभिमानशून्य स्वभाव आणि एकूणच लाचार कार्यपद्धती त्यामुळेच आपल्याला मुख्यमंत्री करण्यात आले.

Coronavirus

आपल्यापेक्षा ( Devendra Fadanvis ) कितीतरी पट हुशार आणि पक्षात वरीष्ठ असलेल्या नेत्यांच्या विरोधात आपण कपट कारस्थाने करून हे पद मिळविले. आपल्यासारखा स्वाभिमानशून्य चाकर त्या दोन भाईंना पाहिजेच होता.

देवेंद्रजी, फक्त वरवरचा अभ्यासूपणा दाखवून आणि पोपटपंची करून जनमानसांत दीर्घकालीन प्रेम मिळविता येत नाही हे आपण सिद्ध केले. सुरूवातीला तुमच्या या ‘गुणांवर’ आम्ही सुद्धा फसलो होतो. विधानभवनात काय ते तुमचे अभ्यासू वाटणारे भाषण, काय तो बिनतोड युक्तिवाद, काय ती देहबोली…

तुमच्या सुरूवातीच्या कार्यकाळात काही महिने आम्ही भारावूनच गेलो होतो. त्यानंतर तुमचे ( Devendra Fadanvis ) ओरिजिनल गुण दिसायला लागले. तुमचे खुनशी राजकारण किती भयानक आहे हे लोकांना कळायला लागले. तुम्ही विरोधी पक्षाला टार्गेट करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील सहकाऱ्यांनाच टार्गेट करू लागलात.

तुमच्या ( Devendra Fadanvis ) खुर्चीच्या शर्यतीत असलेल्या तुमच्या जिवाभावाच्या लोकांचा तुम्ही एक एक करून राजकीय गळे कापू लागलात. जनतेला सगळं स्वच्छ दिसत होतं. परंतु तुम्ही ताटाखालचा मांजर बनविलेला मीडिया, किंबहुना तुमच्या स्वकियांचाच असलेला मीडिया आणि तुमच्यावर त्या दोन गुजराती भाईंची असलेली कृपादृष्टी ह्यामुळे तुमचा अश्वमेघ चारही बाजूने मस्तवालपणे उधळत होता.

तुम्हाला वाटले की, पुढील २५ वर्षे मीच ( Devendra Fadanvis ) या राज्याचा मुख्यमंत्री. मग ह्या गर्विष्ठपणात तुम्ही किंचाळून बोलू लागलात. ते किंचाळणे म्हणजे तुमचा घमेंडखोरपणा होता. तो घमेंडखोरपणा लोकांच्या लक्षात येत होता. परंतु तुम्हाला त्याची काहीही पर्वा नव्हती. त्यामुळे तुमचा उद्दामपणा वाढतच गेला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन ह्या तुमच्या घमेंडखोर वाक्याचे असंख्य विनोद तयार झाले, तुमची हेटाळणी झाली.

तुम्ही ( Devendra Fadanvis ) महाराष्ट्रातील विनोदी पात्र झालात. त्याचेही तुम्हाला काहीही वाटेनासे झाले. कसेही करून सत्ता तुमच्याच हातात राहिली पाहिजे ह्या तुमच्या बालहट्टापायी तुम्ही कसलीही लाज न बाळगता कारस्थान करीत राहिलात. आपण दोन घटका सत्ता मिळवलीत सुद्धा. परंतु राज्यातील असंख्य जनतेला ते मान्य नव्हते. तुमच्या भाषेत ते नियतीलाच मान्य नव्हते.

बरीच आदळआपट झाली. शेवटी महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. सरकार स्थापन होऊन एक दोन महिन्यातच आपण सरकार विरोधात कट कारस्थान रचू लागलात. सरकार आज पडेल, उद्या पडेल अशी भाकिते करू लागलात. मटकाकींग रतन खत्री पेक्षाही मोठी आकडेमोड करू लागलात. पण ते काही जमलं नाही आपल्याला.

आता आला करोना. आम्हाला वाटले आपण आता सरकारला साहाय्य कराल.  आपला अनुभव सरकारच्या पाठीशी उभा कराल. पण कसले काय ? आपण तर सरकारच खिळखिळे करण्यात आणि मुख्यमंत्र्यांच्या वाटेत काटे पेरण्यातच धन्यता मानू लागलात.

देवेंद्रजी ( Devendra Fadanvis ), करोनाच्या कालावधीत आपण करीत असलेल्या हलक्या दर्जाच्या राजकारणाची नोंद महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक ‘काळा अध्याय’ म्हणून लिहिला जाईल. तुम्ही एक लक्षात ठेवा. इथे सगळ्याची नोंद ठेवली जाते. जसे चित्रगुप्त सगळ्यांची नोंद ठेवतो ना तसेच.

आता नवीन काय तर तुम्हाला ( Devendra Fadanvis ) समाज माध्यमात ट्रोल केले जाते म्हणून पोलिसांत लेखी तक्रार केली आहे. अहो तुम्ही आणि तुमच्या पक्षाने राहुल गांधींना जेवढे ट्रोल केले आहे ना तेवढे ट्रोल संपूर्ण जगात कोणत्याही राजकीय नेत्याला केले नसेल. तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म ?

उगाच अन्याय होतोय, अन्याय होतोय म्हणून बोंबा मारत बसू नका. तुमचा आणि तुमच्या पक्षाचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ ह्याचा अभ्यास करा.

त्या दोन भाईंनी तुम्हाला मुख्यमंत्री केले कारण तुम्ही फार हुशार होता म्हणून नाही तर महाराष्ट्राचे वाटोळे करून, त्याचे महत्त्व कमी करून, गुजरात महाराष्ट्रापेक्षा कसा मोठा होईल ह्याची किंमत ते तुमच्याकडून वसूल करणार होते. ती संपूर्ण वसुली त्यांनी गेल्या पाच वर्षात तुमच्याकडून करून घेतली.

सुरूवातीपासूनच तुम्हाला ( Devendra Fadanvis ) महाराष्ट्राशी काहीही देणेघेणे नाही. तुम्हाला फक्त तुमची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची महत्वाची होती. त्यासमोर महाराष्ट्र गेला उडत हीच तुमची भावना होती. तुमची नाळ महाराष्ट्राशी कधी जुळलीच नाही. तुम्ही गुजरात समोर अक्षरशः नांगी टाकलीत.

तुम्ही महाराष्ट्र द्वेषी होता, आहात आणि पुढेही राहणार यात यत्किंचितही शंका नाही.

महाआघाडीचे हे सरकार कसेही करून पुढील पाच वर्षे तर चालणारच चालणार. नव्हे पुढील १५ वर्षे तर नक्कीच चालणार. तुम्ही कितीही खोडा घाला, चाणक्य नीती वापरा. हे सरकार टिकणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. किंबहूना ती महाराष्ट्रातील अस्सल मराठी माणसाची इच्छा आहे. ही श्रीं ची इच्छा आहे असे समजा. त्यामुळे कृपा करून शांत राहा.

सरकारला त्यांचे काम करू द्या. तुम्ही जास्त किंचाळू नका. घशाला सांभाळा. संगीताचा क्लास लावा. राजकीय खेळया खेळण्यापेक्षा संगीतामध्ये जास्त रस घ्या. तुम्हाला मॉडेलिंगमध्ये जास्त इंटरेस्ट आहे तिकडे लक्ष द्या.

इतिहास पंडित जवाहरलाल नेहरूंना संपूर्ण भारताचा प्रधानमंत्री म्हणूनच पाहतो. मोदींना मात्र तसे कधीही पाहणार नाही. ते गुजरातचे म्हणूनच पाहिले जाईल. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सुद्धा कधीही आपल्याला मराठी म्हणून पाहणार नाही ते तुम्हाला महाराष्ट्रातील गुजरातचा प्रतिनिधी ( नाईलाजाने अतिशय सौम्य शब्द वापरावा लागत आहे ) म्हणूनच आपल्याकडे पाहतील.

देवेंद्रजी ( Devendra Fadanvis ), आपण महाराष्ट्रात राहता, खाता, महाराष्ट्रातून मिळणाऱ्या उत्पन्नातुन पगार घेता. या राज्याप्रती आपण थोडे तरी ऋणी राहावे असे आपल्याला कधीच वाटत नाही का हो ? इतके कसे आपण महाराष्ट्र द्वेषी ??

असो. महाराष्ट्रात अनाजी पंतांची जागा तुमच्याशिवाय अजून दुसरा कोण चालवू शकतो ??

जय गुजरात !!

एक सच्चा महाराष्ट्रवादी,

अ‍ॅड. विश्वास काश्यप

(लेखक निवृत्त पोलीस अधिकारी आहेत, व सध्या मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात)

हे सुद्धा वाचा

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख, विकास लवांडे यांना संधी देण्याची मागणी

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून परतफेड, साधूंच्या हत्येबद्दल योगी आदित्यनाथांना केला फोन

Lockdown2 : ‘आमदार कोळंबकरांच्या बेजबाबदारपणाबद्दल भाजप व देवेंद्र फडणवीस गप्प का ?’

Mumbai has natural ecosystem for IFSC, will complement GIFT: Devendra Fadnavis

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी