31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeराजकीयUddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून परतफेड, साधूंच्या हत्येबद्दल योगी आदित्यनाथांना केला फोन

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून परतफेड, साधूंच्या हत्येबद्दल योगी आदित्यनाथांना केला फोन

टीम लय भारी

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये दोन साधूंची हत्या झाल्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनीही घेतली आहे. त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना संपर्क साधून या प्रकरणी चिंता व्यक्त केली आहे.

Coronavirus
उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्य नाथ यांना फोन केला

विशेष म्हणजे, पंधरवड्यापूर्वी पालघरमध्ये दोन साधूंसह तिघांची हत्या एका जमावाने केली होती. या हत्येनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) फोन केला होता. पालघरमधील साधूंच्या हत्येनंतर अनेक समाजकंटकांनी त्याला धार्मिक रंग दिला होता. सामाजिक वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न केला होता.

अनेक धर्मांधानी ठाकरे ( Uddhav Thackeray ) सरकारवर हवेतले आरोप करून टीका केली होती. अशातच योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) फोन करून पालघरमधील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. योगी आदित्यनाथ यांनी फोन केल्यामुळे समाजकंटकांना आणखी चेव चढला. अशा समाजकंटकांनी पालघर हत्याकांडाचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला.

पण अवघ्या १५ दिवसांतच दुर्दैवाने उत्तर प्रदेशमध्येही दोन साधूंची हत्या झाली. याची दखल उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी घेतली. ठाकरे यांनी योगी आदित्यनाथांना फोन करून चिंता व्यक्त केली. ‘या अमानुष घटनेविरूद्ध आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, तशी तुम्ही सुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल’ अशी अपेक्षा ठाकरे यांनी योगींकडे व्यक्त केली.

‘या घटनांना कुणीही धार्मिक रंग देऊ नये’ असे आवाहनही ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी केले आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासोबत झालेल्या या संभाषणाची माहिती ठाकरे यांनी ट्विटरवरून जाहीर केली आहे.

ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमधील घटनेची गंभीर दखल घेतलीच, पण ‘फोन’ करून परतफेडसुद्धा केल्याचे दिसत आहे.

‘हिंदू विरोधी भाजप’

बुलंद शहरमधील दोन साधूंच्या हत्येनंतर सोशल मीडियात जोरदार वातावरण तापले आहे. ‘योगी आदित्य राजीनामा द्या’ आणि ‘हिंदू विरोधी भाजप’ हे दोन ट्रेंड ट्विटरवर जोरात सुरू आहेत. लोकांना भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रात साधूंची हत्या झाल्यानंतर त्याचे भाजपने लगेच भांडवल केले, पण उत्तर प्रदेशमधील या प्रकारावर भाजप गप्प का आहे असा सवाल करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

Lockdown2 : ‘आमदार कोळंबकरांच्या बेजबाबदारपणाबद्दल भाजप व देवेंद्र फडणवीस गप्प का ?’

#PalgharLynchingTruth : फडणवीसांच्या काळात धुळ्यात 5, चंद्रपूरात एका गोसाव्याची हत्या झाली होती : शिवसेनेचे टीकास्त्र

Arnab Goswami : अर्णव गोस्वामींमुळे मराठी उद्योजक व त्यांच्या आईने केली होती आत्महत्या

पालघर के बाद अब बुलंदशहर में दो साधुओं की हत्या, आरोपी गिरफ्तार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी