30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमुंबईसंजय राऊतांची भूमिका राज्यातील जनतेला आवडली, काँग्रेसने केले कौतुक

संजय राऊतांची भूमिका राज्यातील जनतेला आवडली, काँग्रेसने केले कौतुक

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगली भूमिका बजावली. समतोल राखला, व त्यांची भूमिका महाराष्ट्रातील जनतेला आवडली. राऊत आमचे जुने व चांगले मित्र आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राऊत यांची स्तुती केली.

आज काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कार्याध्यक्ष आमदार विश्वजीत कदम यांच्यासह इतर नेत्यांनी राऊत यांची लिलावती रूग्णालयात भेट घेतली. राऊतांच्या भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केल्याचे थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

थोरात यांनी यावेळी सत्तेच्या वाटपाबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. कालच दिल्लीतील नेते आले होते. सर्व काही त्यांनी स्पष्ट केले आहे. सर्व काही व्यवस्थीत सुरु आहे. पुढील बैठकीत सर्व काही निर्णय घेतले जातील असेही ते म्हणाले.

सोमवारी रात्री राऊत यांच्या अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळून आले होते. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या कालावधीत सर्व पक्षांचे नेते राऊत यांच्या भेटीसाठी जात होते. काही वेळापूर्वीच राऊत यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आता ते त्यांच्या घरी रवाना झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

फडणवीसांनी ट्विटरवरील पद बदलले, ‘महाराष्ट्राचा सेवक’ असे लिहिले

स्थिर सरकारसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं हलाहलही पचवू – शिवसेना

शिवसेना, राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद, तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी