30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार स्वत:च कारचं सारथ्य करतात तेव्हा...

अजित पवार स्वत:च कारचं सारथ्य करतात तेव्हा…

टीम लय भारी

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार  यांनी स्वत: कारचा ताबा घेत बारामतीची पाहणी केली. यावेळी शहरात मास्क, हँडग्लोव्हजच्या वापरासह सातत्याने सॅनिटायझेशन करणे, शारिरीक अंतर राखणे अशा अनेक कार्यक्रमांची त्यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गाडीसोबत कुठलाही बंदोबस्त घेतला नव्हता.

बारामतीत विकासकामांची पाहणी करताना अजित पवारांनी त्यांच्या कारचं स्टेअरिंग स्वत:च्या हाती घेतलं. त्यांनी त्यांची टोयाटो लँड क्रुझर स्वत: चालवत अधिकाऱ्यांकडून बारामतीबाबत माहिती घेतली. यावेळी अजित पवारांनी सोशल डिस्टिंगचं काटेकोरपणे पालन केलं. त्यांनी त्यांच्या गाडीत कुणालाही बसण्याची परवानगी दिली नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याच्या उद्देशाने त्यांनी सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं. तसेच, राँग साईडवरुन येणाऱ्यांना देखील अजित पवारांनी खडसावले. शिवाय, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असा सल्लाही दिला.

अन् गाडीत बसण्यासाठी कुणालाही परवानगी दिली नाही…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गाडीसोबत कुठलाही बंदोबस्त घेतला नव्हता. त्यामुळे अजितदादा गाडीतून उतरताच परिसरातील नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. अजित पवार यांनी स्वत: शहरात कार चालवत विकासकामांची प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी