28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeसंपादकीयडॉ. सुजय विखेंची चिडचिड, ७ मोबाईल फोडले !

डॉ. सुजय विखेंची चिडचिड, ७ मोबाईल फोडले !

लय भारीचा नगर मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे. या दौ-यादरम्यान मतदार संघातील शेतक-यांशी, व्यापा-यांशी, तरूणांशी संवाद साधत असतानाच लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी निलेश लंके यांच्या निलेश लंके सामाजिक प्रतिष्ठान, अहिल्यानगर या संस्थेचे अध्यक्ष राहुल झावरे यांच्याशी संवाद साधला आहे(Condition of Dr.Sujay Vikhe Patil). निलेश लंके हे जनसामान्यातील नेता असून त्यांची ही वाढती लोकप्रियता पाहून विखे पाटलांनाही आता निवडणुक कोणाच्या पारड्यात विजय टाकणार याचा अंदाज आला आहे. यामुळेच राधाकृष्ण विखे पाटलांनी निलेश लंकेंना सर्व स्तरावर मॅनेज करायचा प्रयत्न केला आहे. अगदी साम-दाम-दंड-भेद अशा सर्व मार्गांचा अवलंब विखे पाटलांनी निलेश लंकेंसाठी केला, असे झावरे यांनी सांगितले. शर्थीचे प्रयत्न करूनही लंके काही आपल्यापुढे झुकत नाहीत, उलट मतदारसंघात लंकेच्या बाजूने सगळे वारे फिरताना पाहून सुजय विखे पाटलांची होणारी चिडचिड कोणापासून लपलेली नाहीये, याच चिडचिडीत त्यांनी रागाच्या भरात ७ मोबाईल फोडल्याचंही विखे पाटलांच्याच लोकांनी सांगितल्याचं राहुल झावरे यांनी सांगितलं. राधाकृष्ण पाटलांच्या विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्यावर आठशे पन्नास कोटींचं कर्ज आहे. शिवाय विखे घराण्याने सुरू केलेल्या मुळा-प्रवरा इलेक्ट्रिक सोसायटीने बॅंकेचे २२०० कोटी थकवले होते, ज्याची केस ही सुरू होती. तर असे हे विखे-पाटील पिता-पुत्र त्यांच्या या भ्रष्ट काराभारामुळे नेहमीच चर्चेत राहीलेले आहेत. याउलट निलेश लंके यांनी मतदारांच्या मनात त्यांच्या कार्यातून एक जागा निर्माण केली आहे. निलेश लंकेंनी जेव्हा आमदारकीचा राजीनामा दिला होता तेव्हा १०,००० लोकं रडली होती, त्यातच सगळं सिध्द होतं, असे राहुल झावरे यांनी लय भारीशी बोलताना सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी