29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रCoronaVirus : रेल्वेतून प्रवास केला, अन् ‘कोरोना’ झाला

CoronaVirus : रेल्वेतून प्रवास केला, अन् ‘कोरोना’ झाला

CoronaVirus रूग्णांचे प्रमाण आज घटले

टीम लय भारी

मुंबई : एकमेकांच्या संपर्कात आल्याने काय होऊ शकते याचे नवे उदाहरण समोर आले आहे. ठणठणीत असलेल्या दोघा जणांना रेल्वे प्रवास करताना ‘कोरोना’ची ( CoronaVirus  ) लागण झाली आहे. त्यातील एक रूग्ण सिंधुदुर्गचा आहे, तर दुसरा नागपूरचा आहे. या दोघाजणांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेतून प्रवास केला होता. प्रवासात त्यांचा अन्य बाधित रूग्णासोबत संपर्क आला. या संपर्कामुळे त्यांना ‘कोरोना’  ( CoronaVirus  ) झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या आठवडाभरात ‘कोरोना’बाधित ( CoronaVirus  ) रूग्ण मोठ्या संख्येने आढळून येत होते. पण आज अवघे ३ रूग्ण आढळले आहेत. यात या दोन रेल्वे प्रवाशांचा समावेश आहे. ‘लॉकडाऊन’मुळे नवे रूग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. रेल्वे, बस सेवा बंद करण्याबरोबरच गर्दी टाळण्याचे उपाय सरकारने केले आहेत. त्यामुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क कमी झाला आहे. परिणामी नवे रूग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाल्याचे बोलले जात आहे.

नव्या तीन रूग्णांमुळे गुरूवार संध्याकाळपर्यंत राज्यातील एकूण कोरोना बाधित ( CoronaVirus  ) रुग्णांची संख्या १२५ झाली आहे. मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, राज्यात आज एकूण २६९ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

गोवंडी येथील मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणारी एक ६५ वर्षीय महिला टंडन हॉस्पिटल, डी वाय पाटील हॉस्पिटल अशा दोन रुग्णालयांकडून संदर्भित होऊन वाशी येथील जनरल हॉस्पिटल येथे अत्यंत गंभीर अवस्थेत दिनांक २४ मार्च रोजी दुपारी भरती झाली. तिचा त्याच दिवशी रात्री मृत्यू झाला. ती करोना बाधित ( CoronaVirus  ) असल्याचे प्रयोगशाळा अहवालावरुन काल स्पष्ट झाले. तिच्या परदेश प्रवासाबाबत अथवा इतर संपर्काबाबत माहिती घेण्यात येत आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील असा

पिंपरी चिंचवड मनपा       १२

पुणे मनपा                         १८

मुंबई                                ४९

सांगली                         ९

नवी मुंबई , कल्याण डोंबिवली ६

नागपूर                          ५

यवतमाळ                               ४

अहमदनगर, ठाणे      प्रत्येकी ३

सातारा, पनवेल          प्रत्येकी २

उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार,पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग प्रत्येकी १

एकूण  १२५

मृत्यू ४

१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३२४३ जणांना भरती करण्यात आले. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी २७५० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १२५ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

coronavirus cure : ‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी..

CoronaVirus : राजपुत्रालाही कोरोनाची लागण

Spain reports 655 deaths in a day: Cononavirus updates

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी