31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रLockdown2 : चुकीची बातमी देणाऱ्या पत्रकाराला अटक, आणखी काही पत्रकार रडारवर

Lockdown2 : चुकीची बातमी देणाऱ्या पत्रकाराला अटक, आणखी काही पत्रकार रडारवर

टीम लय भारी

मुंबई : ‘लॉकडाऊन’मुळे ( Lockdown2 ) अडकलेल्या मजुरांसाठी रेल्वे सुरू होणार असल्याची बातमी दिल्या प्रकरणी एका वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ पत्रकाराला पोलिसांनी पहाटे अटक केली आहे. या बातमीमुळे वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात मंगळवारी मोठी गर्दी उसळल्याचे प्राथमिक कारण समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी ही अटक केली आहे.

Coronavirus

संबंधित पत्रकार हा उस्मानाबाद येथील होता. त्यामुळे उस्मानाबाद पोलिसांनी पहाटे चार वाजता अटक केली. त्यानंतर संबंधित पत्रकाराला पोलिसांनी मुंबईत आणले आहे.

वांद्रे येथील गर्दी जमा केल्याप्रकणी विनय दुबे नावाच्या एका व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर भारतीय महापंचायत या संघटनेचा दुबे हा प्रमुख आहे. दुबे याला न्यायालयाने 21 एप्रिलपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, ‘कोरोना’मुळे जागतिक संकट कोसळले आहे. देशात व महाराष्ट्रात लॉकडाऊन ( Lockdown2 ) सुरू आहे. पण या लॉकडाऊनच्या ( Lockdown2 ) संवेदनशील काळातही सामाजिक व धार्मिक विद्वेष पसरेल अशा पद्धतीने काही पत्रकार बातम्या देत आहेत. कलह निर्माण करणाऱ्या अशा बातम्यांमुळे पोलिसांनी आता कडक पाऊले उचलली आहेत.

एका मराठी वृत्तवाहिनीचे संपादक व दुसऱ्या वृत्तवाहिनीच्या डेप्युटी एडीटरबाबतची माहिती पोलिसांनी जमा केली आहे. या दोन वरिष्ठ पत्रकारांनी यापूर्वी दिलेल्या बातम्या व ‘कोरोना’ संकटकाळातील बातम्यांची पडताळणी पोलिसांनी केली आहे. कुणाच्या सांगण्यावरून हे संपादक व डेप्युटी एडिटर आपल्या वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बातम्या’ पेरण्याचे काम करीत आहेत याचीही तपासणी पोलीस करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

Lockdown2 : मजुरांसाठी रेल्वे सुटणार असल्याच्या चुकीच्या ‘बातमी’ने वांद्रे स्थानकात उसळली गर्दी

Covid19 : उद्धव ठाकरेंचा इशारा, आग भडकविण्याचे काम करू नका, मी सहन करणार नाही

WHO चा संदर्भ देऊन ‘लॉकडाऊन’चा खोटो संदेश व्हायरल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी