29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
HomeराजकीयUddhavresign : ठाकरे यांच्या विरोधात समाजकंटकांची सोशल मीडियात नवी मोहीम

Uddhavresign : ठाकरे यांच्या विरोधात समाजकंटकांची सोशल मीडियात नवी मोहीम

टीम लय भारी

मुंबई : तबलिगींच्या मुद्द्यावरून मुस्लिमांची बदनामी करणे, वाधवा प्रकरणात पवार – देशमुखांवर हल्ला चढविणे, वांद्रे प्रकरणावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधणे अशा मोहिमा संपल्यानंतर समाजकंटकांनी आता नवी मोहीम राबविली आहे. Uddhavresign अशी नवी मोहीम आता सोशल मीडियात जोरदार सुरू आहे.

तबलिगी, वाधवा व वांद्रे या तिन्ही प्रकरणांवरून उद्धव ठाकरे सरकारवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांनी केला होता. पण तिन्ही प्रकरणात सरकारने पोलिसांकरवी जोरदार कारवाई केली. त्यामुळे भाजपच्या आरोपांतील हवा निघून गेली.

दुसऱ्या बाजूला या तिन्ही प्रकणांवरून समाजकंटकांनी सोशल मीडियात हैदोस घातला होता. आता अचानक उद्धव ठाकरेंच्या ( Uddhavresign ) राजीनाम्याची मोहीम सोशल मीडियात काही समाजकंटकांनी सुरू केली आहे.

Coronavirus

‘कोरोना’ आपत्तीमध्ये उद्धव ठाकरे उत्कृष्ट काम करीत आहेत, असा सामान्य लोकांमध्ये सूर आहे. पण दुसऱ्या बाजूला ठाकरे यांच्या विरोधात ( Uddhavresign ) जोरदार मोहिम सुद्धा राबविण्यात येत आहे. काल वांद्रे प्रकरण घडल्यानंतर सोशल मीडियातील अंधभक्तांनी ठाकरे यांच्या विरोधात जोरदार अपप्रचार करण्यास सुरूवात केली आहे.

आश्चर्य म्हणजे ही मोहिम चालवणाऱ्यांची बहुतांश नावे परप्रांतीय आहेत. वांद्रे प्रकरण, वाधवा प्रकरण, अन्न धान्य वाटप असे मुद्दे उपस्थित करून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांना अनुभव नाही. त्यांच्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे, असा प्रचार ट्विटरवर सुरू आहे. सोनिया गांधी, शरद पवार, शिवसेना यांची व्यंगचित्रेही प्रसारीत करण्यात आली आहेत. उद्धव ठाकरे व अरविंद केजरीवाल यांचे एकत्रित फोटो प्रसिद्ध करून दोघांवरही टीका करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांच्यावर तर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली आहे. अपरिपक्व, बाळ, पप्पू अशी विशेषणे आदित्य ठाकरे यांच्याबद्दल वापरण्यात आली आहेत. आदित्य व उद्धव ठाकरे यांचे फोटोही मॉर्पिंग करण्यात आले आहेत.

तब्बल 41 हजार पेक्षा जास्त ट्विट्स #Uddhavresign या हॅशटॅगने करण्यात आले आहेत. या मोहिमेत परप्रांतीयांची संख्या जास्त आहे.

‘राजकारण करण्याची ही वेळ नाही. कुणीही राजकारण करू नका’ असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी वारंवार केले आहे. तरीही सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर टीका करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेतेही सरकारवर निशाणा साधत आहेत. अशातच आता खालच्या पातळीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

हे सुद्धा वाचा

Lockdown2 : चुकीची बातमी देणाऱ्या पत्रकाराला अटक, आणखी काही पत्रकार रडारवर

Covid19 : उद्धव ठाकरेंचा इशारा, आग भडकविण्याचे काम करू नका, मी सहन करणार नाही

पाकिस्तानातील व्हिडीओ व्हायरल करून भारतातील मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी