30 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरमहाराष्ट्रस्वतःच्या सुरक्षेसाठी सलमान खानने केला गन लायसन्ससाठी अर्ज

स्वतःच्या सुरक्षेसाठी सलमान खानने केला गन लायसन्ससाठी अर्ज

टीम लय भारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला बिश्नोई गँगचा प्रमुख लॉरेन्स बिश्नोई याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. याचमुळे आता बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याने गन लायसन्ससाठी अर्ज केला आहे. यासाठी त्याने आज (दि. २२ जुलै २०२२) मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट सुद्धा घेतली.

काही दिवसांपूर्वी सलमान खान याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते. त्यामुळे खान कुटुंबियात भीतीचे वातावरण देखील पसरले होते. काळविटाची शिकार केल्यामुळे सलमान खानला जीवे मारण्याची धमकी बिश्नोई गॅंगकडून देण्यात आली होती. ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खान याने काळवीटाची शिकार केली होती. काळवीट या प्राण्याला राजस्थानमधील बिश्नोई समाज देव मानतो.

दरम्यान, सलमान खानने केलेल्या याच गुन्ह्यामुळे त्याला न्यायालयाकडून तुरुंगात देखील पाठविण्यात आले होते. परंतु सलमान खानने केलेल्या या गुन्ह्याचा न्याय न्यायालयानुसार नाही होणार तर त्याने आणि त्याच्या वडिलांनी जनतेसमोर येऊन केलेल्या गुन्ह्याची जाहीर माफी मागावी. अन्यथा त्याला जीवानिशी मारू, असे लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून सांगण्यात आले होते. म्हणून आता स्वतःच्या सुरक्षेसाठी सलमान खानकडून (Salman Khan applied for gun license for his own safety) ही पाऊले उचलण्यात आली आहेत.

लॉरेन्स बिश्नोई हा पंजाबमधील गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला याच्या हत्येच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. दोन महिन्यांपूर्वी बिश्नोई गॅंगकडून सिद्धू मुसेवाला याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात होती. या प्रकरणातील दोन आरोपींचे पंजाब पोलिसांकडून एन्काऊंटर देखील करण्यात आले आहे. बिश्नोई टोळीचा प्रमुख असलेल्या लॉरेन्स बिश्नोईवर वयाच्या २८ व्या वर्षात अनेक गंभीर गुन्हे देखील नोंद आहेत. ज्यामुळे सलमान खान याला बिश्नोई टोळीकडून धमकी मिळताच पोलिसांकडून ते अधिक गांभीर्याने घेण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :

काॅंग्रसचे नेते निघाले ‘अतिवृष्टी’ दौऱ्यावर

द्रौपदी मुर्मूंची देशाच्या राष्ट्रपती पदी झालेली निवड हा ‘समस्त‘ स्त्रीशक्तीचा गौरव – अजित पवार

संजय मंडलिकांच्या निर्णयावर सतेज पाटलांनी व्यक्त केली नाराजी

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!