लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होताच, देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरील आपले पद बदलले आहे. ‘महाराष्ट्राचा सेवक’ असे त्यांनी आपल्या ट्विटरवर नमूद केले आहे. यापूर्वी ट्विटरवर काळजीवाहू मुख्यमंत्री असे लिहिलेले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात, 8 नोव्हेंबर रोजी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळण्याची सुचना केली होती. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ट्विटरवर काळजीवाहू मुख्यमंत्री अशी सुधारणा केली होती. काल राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर त्यांनी नव्याने मुख्यमंत्रीपदाचा संपूर्ण तपशिल काढून टाकला आहे. तिथे ‘महाराष्ट्राचा सेवक’ अशी नवी ओळख त्यांनी लिहिली आहे.
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यासह सगळ्याच मंत्र्यांची पदे व त्यांचे अधिकार संपुष्टात आले आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी आपले पद तात्काळ सोडले असल्याचे ट्विटरवर संकेत दिले आहेत.