29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसैनिकांकडून मेट्रोविरोधात गिरगावमध्ये ट्रक,डंपरवर दगडफेक

शिवसैनिकांकडून मेट्रोविरोधात गिरगावमध्ये ट्रक,डंपरवर दगडफेक

लय भारी न्यूज नेटवर्क 

मुंबई : शिवसेना – भाजप सत्तास्थापन्यावरून शिवसेनेनं काडीमोड घेतलं. आता शिवसेना आक्रमक झाली असून, शिवसेनेने गिरगावात मेट्रोविरोधात आंदोलन केलं. आंदोलकांनी वाहनांवर दगडफेक केली आहे. या दगडफेकीत वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे आंदोलनाला हिंसक वळणं लागलं.

मुंबई मेट्रोसाठी केल्या जाणाऱ्या खोदकामामुळे इमारतींना तडे जात असल्याचा आरोप आहे. मेट्रोच्या कामांमुळे डंपर 24 तास सुरु आहेत. त्यामुळे परिसरात भयंकर ट्रॅफिक जॅम होतं. डंपरमुळे अपघात होतात. आवाज आणि गोंगाटामुळे जगणं मुश्किल झालं आहे, असं आंदोलकांचं म्हणणं आहे. जोपर्यंत डंपर बंद होत नाहीत, जोपर्यंत लिखित आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील, असा इशारा स्थानिक शिवसेना नेत्यांनी दिला.

शिवसेना दक्षिण मुंबईच्या विभाग क्र. 12 च्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले आहे. गिरगाव आणि ठाकूरद्वार इथे मेट्रो 3 आणि डी. बी. रियालिटी यांच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी आणि गैरसोय होत आहे. शाळेच्या बस देखील शाळेत उशीरा पोहोचत आहेत. अनेक रहिवाशांचे दुचाकी अपघात होत आहेत. स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास आणि गैरसोय होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी