28 C
Mumbai
Sunday, June 16, 2024
Homeव्हिडीओकौशल्य विद्यापीठात रोजगाराभिमूख अभ्यासक्रम | कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर यांची मुलाखत

कौशल्य विद्यापीठात रोजगाराभिमूख अभ्यासक्रम | कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर यांची मुलाखत

नुकताच बारावीचा निकाल लागलेला असून आता पालक आणि विद्यार्थी यांची पुढे काय या प्रश्नाला घेउन चांगलीच धांदल उडालेली आहे. यालाच लक्षात घेऊन विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन मिळावे या हेतूने लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर यांची मुलाखत घेतली आहे.

नुकताच बारावीचा निकाल लागलेला असून आता पालक आणि विद्यार्थी यांची पुढे काय या प्रश्नाला घेउन चांगलीच धांदल उडालेली आहे(Interview with Vice Chancellor Dr. Apoorva Palkar). यालाच लक्षात घेऊन विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन मिळावे या हेतूने लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा हेतू विद्यार्थ्यांना करिअरशी संबंधित वेगवेगळ्या क्षेत्रांविषयी माहीती मिळावी हा असून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले आहे. जर एखादी व्यक्ती सिक्यरिटी गार्ड असेल तर तो पुढे काही करू शकणार नाही, या उक्तीला खोटं ठरवण्याचं काम आमच्या संस्थेने केले आहे, असे पालकर यांनी सांगितले.

आपल्या संस्थेविषयी त्यातील अभ्यासक्रमाविषयी माहिती सांगताना चाळीस टक्के क्लासरूम तर साठ टक्के ऑन दी जॉब अशाप्रकारे विद्यार्थ्यांना शिकवण्यात येते. जेणेकरून त्यांना कामाचा प्रत्यक्ष अमुभवही घेता यावा. विद्यालयात स्किल बेस्ड ट्रेनिंग दिले जात असून पारंपारिक विद्यालय आणि आपल्या विद्यालय़ात फरक असल्याचं पालकर यांनी सांगितले. शिवाय इंडस्ट्रीसोबत विद्यालयाचे टाइ अप असून टाटा-झुडिओ सारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्याविषयी खात्री पालकर यांनी येथे दिली आहे. देशासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपण विद्यार्थ्यांना कामाची संधी उपलब्ध करून देतो असे अपूर्वा पालकर यांनी लय भारीचे संपादक तुषार खरात यांना मुलाखतीत सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी