31 C
Mumbai
Saturday, June 15, 2024
Homeव्हिडीओअपघाताचे बळी, अजितदादांची संस्कृती

अपघाताचे बळी, अजितदादांची संस्कृती

७० हजार कोटी रूपये पावण करून घेण्यासाठी भाजपच्या शय्येवर अजितदादा पवार जावून पडले(Accident victims, Ajit Pawar dad's culture). त्यासाठी त्यांनी नितिमत्ता, विधीनिषेध, नातेसंबंध असं सगळंच कमरेचं सोडून डोक्याला बांधलं. मुळातच अजितदादा म्हणजे आडदांड व आडमुठं व्यक्तीमत्वं.

७० हजार कोटी रूपये पावण करून घेण्यासाठी भाजपच्या शय्येवर अजितदादा पवार जावून पडले(Accident victims, Ajit Pawar dad’s culture). त्यासाठी त्यांनी नितिमत्ता, विधीनिषेध, नातेसंबंध असं सगळंच कमरेचं सोडून डोक्याला बांधलं. मुळातच अजितदादा म्हणजे आडदांड व आडमुठं व्यक्तीमत्वं. अधिकाऱ्यांवर दादागिरी करणं, सरकारचं मालक असल्याप्रमाणं वागणं अशी मस्ती अजितदादांमध्ये आहे. त्यामुळे त्यांचे अनुयायीसुद्धा तसेच वागतात. बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत अजितदादांचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी एका व्यक्तीला दमदाटी केल्याचं, त्याला शिवीगाळ केल्याचं अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं.
आता सुनील टिंगरे नावाच्या आमदारानं आपलं खलनायकी रूप दाखवून दिलंय. पुण्यात शिकण्यासाठी बाहेरच्या राज्यातून आलेल्या तरूण – तरूणीला पोर्श या अलिशान गाडीने उडवलं. गाडी चालवणारं कार्ट अल्पवयीन होतं. पण त्याचा बाप गबर पैसेवाला आहे. अशा धनदांडग्यांना सामान्य व गोरगरीब जनतेची किंमत किड्यामुंग्यांप्रमाणे वाटत असते. एक दोन मेली म्हणून या धनदांडग्यांना काही फरक पडत नाही. वेदांत नावाच्या त्या कार्ट्यानं पबमध्ये जावून दारू डोसली होती, अन् त्यासाठी तब्बल ४८ हजार रूपये मोजले होते. सोबत ड्रायव्हर होता. पण या कार्ट्यानं ड्रायव्हरला बाजूला बसवलं, अन् स्वतःच गाडी चालवली. नशेत धूंद असलेल्या या कार्ट्यानं दुचाकीला उडवलं. त्यात त्या निष्पाप तरूण – तरूणीचा मृत्यू झाला. गाडी ते कार्टच चालवत होतं याचं चित्रीकरणही झालंय. विशाल अग्रवाल नावाचा मोठा बिल्डर आहे. त्याचं हे पराक्रमी कार्ट.
हे सगळं प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पहाटे तीन वाजता आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात पोचले. सुनील टिंगरे हे वडगाव शेरी या मतदारसंघाचे आमदार आहेत. या मतदारसंघात संबंधित पोलीस ठाणे आहे. सुनील टिंगरे यांचे व बिल्डर विशाल अग्रवाल यांचे व्यासायिक संबंध असल्याचा आरोप विनिता देशमुख या सामाजिक कार्य करणाऱ्या भगिणीने केलाय.
बिल्डर, कंत्राटदार, ठेकेदार यांच्याशी संबंध निर्माण करायचे, त्यातून अमाप पैसा जमा करायचा ही संस्कृतीच अजितदादा पवार यांनी राजकारणात आणली. एकनाथ शिंदे यांनी या संस्कृतीचा समृद्धी पॅटर्न यशस्वी करून दाखवला. गणपतराव देशमुख यांच्यासारखे स्वच्छ चारित्र्याचे आमदार तुम्हाला शोधूनही सापडणार नाहीत. उलट गणपतराव देशमुखांच्या मतदारसंघात खोकेवाले बोके घडविण्याचं काम एकनाथ शिंदे करीत आहेत. कंत्राटदार, बिल्डर यांच्याशी नाते वृद्धींगत करणारे लोकप्रतिनिधी अधिक संख्येने सापडतील. आपले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याचेच ते धोरण आहे म्हटल्यावर त्यांचे आमदार तरी कसे मागे राहतील ?
आमदार – खासदार अनेक कामं मंत्रालयात घेवून येत असतात, ‘जनतेची कामं’ असं गुबगुबीत लेबल त्यासाठी ते लावतात. वास्तवात, अशी कामं म्हणजे त्या आमदार – खासदारांचे स्वतःचेच धंदे असतात. बिल्डर, कंत्राटदार, ठेकेदार, बदल्या.. अशी माया मिळवून देणारी कामे आमदार, खासदार मंत्रालयात घेवून येत असतात.
कंत्राटदार, बिल्डर अशा धनिकांसोबत आमदार – खासदारांची भागिदारी असते. त्यामुळं हे लोकप्रतिनिधी लोकांचे प्रतिनिधी नावापुरतेच राहिलेले आहे. निवडून येण्यापुरतीच त्यांना जनतेची आठवण येते. एकदा का निवडणूक झाली की, त्यांच्या मंत्रालयात, सरकार दरबारी चकरा सुरू होतात. या सगळ्या चकरा तथाकथिक विकास कामांसाठी असतात. विकासकामांच्या आडून कंत्राटे मिळविणे, बिल्डरांसारख्या धनिकांची कामे सोपी करून देणे यातच त्यांना जास्त रस असतो. नवनवीन कामे काढायची, ती कामे आपल्यालाच मिळवायची, त्यासाठी फायलींचा पाठपुरावा करायचा. एखाद्या अधिकाऱ्याने फायलीत पाचर मारली, तर त्याचा कंड जिरवायचा. अधिकाऱ्यांच्या बदल्या करायच्या, आपल्या सोयीचा अधिकारी आणायचा. या बदल्यातूनही पैसे मिळवायचे हा जवळपास सगळ्याच लोकप्रतिनिधींचा राजरोस धंदा झालाय.
सुनील टिंगरे आणि बिल्डर विशाल अग्रवाल यांच्यातील नातेसंबंध यापेक्षा काही वेगळे असतील असे वाटत नाही. सुनील टिंगरे यांनी सरकार दरबारी, मंत्रालयात यापूर्वी कोणकोणती कामे आणली होती, याचे इन्व्हेस्टिगेशन केले तर टिंगरे व अग्रवाल यांचे संबंध किती मधूर होते, हे समजण्यास वेळ लागणार नाही.
लोकहिताच्या नावावर लोकप्रतिनिधी धनदांडग्यांना पाठबळ देतात. लोकशाहीचं वस्त्रहरण करतात. त्यात बिचाऱ्या गोरगरीबांचे नाहक बळी जातात.
लोकसभा निवडणुकीत अजितदादा पवार बेंबीच्या देठापासून केकाटत होते, मला विकास करायचाय. दादांना हवा असलेला हाच तो विकास आहे. दादा आणि त्यांचे आमदार – खासदार महाराष्ट्राला कोणत्या विकासाकडे घेवून जाणार आहेत, त्याची ही छोटी झलक आहे.
त्या कार्ट्यानं दारू पिवून गाडी चालवली होती. एका पबमध्ये त्यानं दारू ढोसली होती. पब आणि दारूला उत्तेजन किती घाणेरड्या पद्धतीनं दिलं जातंय. त्यात नवी पिढी कशी नासवली जातेय, यावर आम्ही दुसरा एक व्हिडीओ लवकरच तयार करणार आहोत. आमचा तो व्हिडीओ नक्की पाहा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी