28 C
Mumbai
Sunday, June 16, 2024
Homeव्हिडीओवेदांत अगरवालचे पाप मोठे, शिक्षा चिमुकली

वेदांत अगरवालचे पाप मोठे, शिक्षा चिमुकली

१८ मेच्या रात्री साधारण अडीच ते तीनच्या सुमारास पुण्याच्या कल्याणी नगरच्या ट्रम्प टॉवरच्या आवारात मोठा आवाज झाला. आवाज ऐकताच तेथे उपस्थितीतांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. एका पोर्श गाडीने पल्सरला मागून येउन धडक दिली असून ती पल्सर पुढे असलेल्या स्विफ्टवर आदळली

१८ मेच्या रात्री साधारण अडीच ते तीनच्या सुमारास पुण्याच्या कल्याणी नगरच्या ट्रम्प टॉवरच्या आवारात मोठा आवाज झाला(Pune Porsche accident: Minor Vedant Agarwal gets bail after writing 300-word essay). आवाज ऐकताच तेथे उपस्थितीतांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. एका पोर्श गाडीने पल्सरला मागून येउन धडक दिली असून ती पल्सर पुढे असलेल्या स्विफ्टवर आदळली. हा अपघात एवढा भयानक होता कि पल्सरवरील तरूण-तरूणीचा जागीच मृत्यू झालेला. अपघातानंतर पोर्श चालवणारा युवक तेथून पळ काढताना दिसताच उपस्थित जमावाने आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला शिवाय पोलिसात कॉल करून तक्रार ही नोंदवण्यात आली.या अपघातातील आरोपी वेदांत अग्रवाल हा विशाल अग्रवाल या बिल्डरचा मुलगा आहे. १८ मे ला ग्रॅज्युशनची पार्टी करण्यासाठी एका हॉटेल मध्ये गेलेला. पार्टी केल्यानंतर हा मित्रपरिवार ब्लॅक पब येथे दारू पिण्यासाठी पोहचले. दारूची पार्टी करून निघत असताना आरोपी वेदांतने गाडी त्याच्या ड्राइव्हरला चालवू न देता स्वःतकडे घेतली. वेदांत गाडी चालवत होता, त्याच्या शेजारी त्याचा ड्राइव्हर आणि मागे इतर मित्र बसलेले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी