31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रनागपूरच्या महापौरांवर गोळीबार, अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे हल्ला झाल्याची शक्यता

नागपूरच्या महापौरांवर गोळीबार, अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे हल्ला झाल्याची शक्यता

लय भारी न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूरचे महापौर संदिप जोशी यांच्यावर मध्यरात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने या गोळीबारात कुणीही जखमी झाले नाही. नागपूर महापालिकेने अतिक्रमणांविरोधात धडक मोहिम हाती घेतली आहे. यात हितसंबंध गुंतलेल्या काहीजणांनी हा गोळीबार केला असावा अशी शक्यता जोशी यांनी व्यक्त केली आहे.

काल जोशी यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे जोशी कुटुंबिय व मित्र परिवार जेवणासाठी हॉटेलवर गेले होते. जेवण झाल्यानंतर जोशी वाहनाने घरी परत जात असताना मोटार सायकलवरून हल्लेखोर आले. त्यांनी जोशी यांच्या दिशेने गोळीबार केला. परंतु या गोळ्या गाडीवर लागल्या. जोशी अथवा गाडीतील अन्य कुणालाही गोळी लागली नाही. त्यामुळे सुदैवाने सगळेजण बचावले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. जोशी यांनी रात्री नागपूर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विशेष म्हणजे, जोशी या यापूर्वी ६ व १२ डिसेंबर रोजी काहीजणांकडून धमक्या आल्या होत्या. अतिक्रमण काढले तर तुम्हाला ठेवणार नाही. अशा स्वरूपाची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर काल रात्री हा हल्ला झाला आहे.

भाजप आक्रमक होणार

संदिप जोशी यांच्यावर गोळीबार झाल्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. महापौर सुरक्षित नसतील तर कायदा व सुव्यवस्था कशी राखली जाईल, असा सवाल त्यांनी केला आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करतानाच आम्ही सरकारवर दबाव आणणार असल्याचे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलाताना सांगितले. त्यामुळे अधिवेशनात भाजपकडून या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरेंच्या मदतीला शरद पवार धावले

रा. स्व. संघाच्या अभ्यासवर्गाला राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, जयकुमार गोरेंची हजेरी

मंत्रीमंडळाला अंधारात ठेवून उच्च शिक्षण विभागात भरतीचा घाट

मंत्र्यांकडे पीएस, ओएसडी पदांवर वर्णी लावण्यासाठी शेकडोजणांचे लॉबिंग

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी