29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeमुंबईVIDEO : शाळकरी मुलांना अभियांत्रिकीची तोंड ओळख; राज्य सरकारचा 'लय भारी' उपक्रम...

VIDEO : शाळकरी मुलांना अभियांत्रिकीची तोंड ओळख; राज्य सरकारचा ‘लय भारी’ उपक्रम !

शाळकरी मुलांना अभियांत्रिकी शिक्षणाबद्दल फार काही माहित नसते. परंतु शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या निकटच्या पॉलिटेक्निक संस्थामध्ये न्यायचे. त्यांना त्या संस्थेतील प्रयोगशाळा, यंत्र सामुग्री व अन्य पायाभूत सुविधा दाखवायच्या असा उपक्रम राज्य सरकारच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने हाती घेतला आहे. ‘स्कूल कनेक्ट’ असे या उपक्रमाचे नाव आहे. संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी या उपक्रमावर चांगला भर दिला आहे. या उपक्रमामुळे शाळकरी मुलांना अभियांत्रिकी शिक्षणाबद्दल माहिती मिळते. त्यांना त्यामध्ये गोडी निर्माण होते. या उपक्रमामुळे गेल्या शैक्षणिक वर्षात पॉलिटेक्निक संस्थांमधील प्रवेशांमध्ये एकूण १० टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती डॉ. वाघ यांनी ‘लय भारी’ला दिली. हा उपक्रम नक्की काय आहे ते जाणून घ्या डॉ. वाघ यांच्याच तोंडून…

 

हा व्हिडीओ आवडला असल्यास आमचा यू ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा अन् शेअर करा.

VIDEO : शाळकरी मुलांना अभियांत्रिकीची तोंड ओळख; राज्य सरकारचा 'लय भारी' उपक्रम !
जाहिरात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी