31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय...

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे.त्यासाठी रस्ते खोदण्यात आले मात्र ते व्यवस्थित बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी दुचाकी धारकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असून रस्त्यावरची माती जाऊन डांबरीकरन कधी होईल असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.एम एन जि एल तर्फे गॅस वाहिनी टाकण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील विविध भागात रस्ते खोदण्यात आले आहेत . शहरातील मुख्य भागात अनंत कान्हेरे मैदानाजवळचा रस्ता , टिळकवाडी तसेच शहरातील अनेक उपनगरामध्ये अशा प्रकारे खोदकाम करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे.त्यासाठी रस्ते खोदण्यात आले मात्र ते व्यवस्थित बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी दुचाकी धारकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असून रस्त्यावरची माती जाऊन डांबरीकरन कधी होईल असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी टाकण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील विविध भागात रस्ते खोदण्यात आले आहेत . शहरातील मुख्य भागात अनंत कान्हेरे मैदानाजवळचा रस्ता , टिळकवाडी तसेच शहरातील अनेक उपनगरामध्ये अशा प्रकारे खोदकाम करण्यात आले आहे.(Nashik Municipal Corporation’s construction department turns a blind eye to MNGL Gas , citizens are suffering )

ते रस्ते खोदल्यानंतर आणि गॅस वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्वच ठिकाणी रस्ते व्यवस्थित बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.याबाबत मनपा प्रशासन मात्र कानावर हात ठेवत असून मनपा प्रशासनाच्या या भूमिकेमुळे दुचाकीधारकाचा जीव दररोज धोक्यात येत आहे.याबाबत मनपाची भूमिका जाणून घेण्यासाठी शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

शहरातील तीन आणि पाच वर्ष मुदतीतील निकृष्ट, दर्जाहीन रस्त्यांची दुरुस्ती बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारांकडून केली नसल्याबाबत माजी महापौर दशरथ पाटील यांनी सॅन २०२२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे. त्यावेळी मनपा प्रशासनाने संबंधित रस्त्यांची दुरुस्ती करीत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. ही याचिका सुनावणीसाठी न्यायालयात अद्यापही प्रलंबित आहे. नव्या रस्त्याच्या बांधणीनंतर तीन ते पाच वर्ष देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर असते. दर्जेदार रस्ते करून घेण्याची मनपाची जबाबदारी आहे. मनपाने न्यायालयात मांडलेली बाजू आणि शहरातील रस्त्यांची स्थिती यात कमालीचा फरक असल्याकडे पाटील यांनी लक्ष वेधले होते. सन २०२३ मध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसातही नव्या रस्त्यांवरील डांबर वाहून गेले. अनेक ठिकाणी खड्डे पडले. त्यामुळे या निकृष्ट रस्त्यांचे पितळ उघडे पडल्याचे पाटील यांनी सांगितले होते. डांबरी रस्त्यांच्या दर्जाहीन कामांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे त्यात एम एन जि एलने अजून काही रस्ते खोदल्याने शहरात अनेक ठिकाणी रस्त्यालगत मातीचे साम्र्याज पसरलेले दिसते .डांबरी रस्त्यांच्या दर्जाहीन कामांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे त्यात एम एन जि एलने अजून काही रस्ते खोदल्याने शहरात अनेक ठिकाणी रस्त्यालगत मातीचे साम्र्याज पसरलेले दिसते .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी