28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रNEET 2021 ची तारीख जाहीर; 'या' महिन्यात होणार परीक्षा

NEET 2021 ची तारीख जाहीर; ‘या’ महिन्यात होणार परीक्षा

टीम लय भारी

मुंबई :- देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस आणि बीडीएस सारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षा नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट २०२१ (NEET 2021)  परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, NEET (UG) परीक्षा रविवार, १ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे. इंग्रजी आणि हिंदीसह ११ भाषांमध्ये पेन-पेपर पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे.

उमेदवार नीट यूजी २०२१ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज ntaneet.nic.in या एनटीएच्या संकेतस्थळामार्फत करायचे आहेत. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच करायचे आहेत, दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे एनटीएने स्पष्ट केले आहे.

एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नीट यूजी परीक्षा घेतली जाते. एका उमेदवाराने एकच अर्ज करावयाचा आहे. एनटीएने नीट परीक्षेसंबंधीची माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारांनी आपली पासपोर्ट आकाराची छायाचित्रे आणि पांढऱ्या पार्श्वभूमीवरची ४ बाय ६ पोस्ट कार्ड साइडची रंगीत छायाचित्रे देखील काढून ठेवावीत. ही छायाचित्र ऑनलाइन अर्जात तसेच समुपदेशनाच्या वेळी आवश्यक असतील. जे उमेदवार नीट यूजी २०२१ परीक्षा देणार आहेत, त्यांनी पुढील संकेतस्थळांना नियमितपणे अद्ययावत माहितीसाठी भेट द्यावी. –

https://nta.ac.in
https://ntaneet.nic.in

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी