31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeएज्युकेशनअकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लेक्‍सिकॉन शाळेतर्फे एकात्मिक शैक्षणिक कार्यक्रमाची सुरूवात

अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लेक्‍सिकॉन शाळेतर्फे एकात्मिक शैक्षणिक कार्यक्रमाची सुरूवात

टीम लय भारी

मुंबई : जेइइ, एनइइटी, एमएचसीइटी, सॅट आणि सीएच्या पाया (फाऊंडेशन)साठी तयारी करून घेणे याचा या कार्यक्रमाचे मुळ उद्देश असेल. यातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिक्षणपूर्ती कशी होईल याकडे लक्ष दिले जाईल(Integrated Educational Program by Lexicon School in pune).

पुण्यातील सर्वोत्कृष्ट सीबीएसई शाळांमध्ये सूचीबद्ध असलेल्या लेक्सिकॉन स्कूल्सने, आगामी सत्रापासून इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक शिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. प्रतिष्‍ठित अशा लेक्‍झिकॉन संस्‍था समूहाचा लेक्‍सिकॉन स्‍कूल्‍स हा एक भाग असून ते बालककेंद्रित, प्रगतीशील आणि जागतिक शिक्षण देण्यावर ही संस्था भर देते.

एकात्‍मिक शैक्षणिक कार्यक्रम (इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम) म्हणजे विद्यार्थ्यांना एनइइटी, जेइइ, एमएचसीइटी, सॅट आणि सीए फाऊंडेशनसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतानाच जीवनाकडे पाहाण्याची सर्वांगिण दृष्टी तयार करणे. आणि याचा फायदा इयत्ता अकरावी आणि बारावीच्या सीबीएसई अभ्यासक्रमासाठी होईल. यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगत शैक्षणिक प्रवासासाठी एक पाऊल पुढे टाकण्यास मदत करण्यासाठी लेक्‍सिकॉन सेंटर ऑफ एक्‍सलन्स्‍मधील तज्ञ प्राध्यापकांद्वारे मदत केली जाईल.

हे सुद्धा वाचा

अनुसूचित जातींच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

शिक्षण मंडळाचा निर्णय, 10वी, 12वीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार

Maharashtra government unveils plan to digitise 500 Ashram schools

सध्याच्या युगामध्ये, चांगल्‍या प्रगतीकरीता, डिजिटल मार्केटिंग, अ‍ॅडव्हान्स एमएस एक्सेल, मेमरी टेक्निक्स, कल्चर अँड एथिक्स आणि पर्सनल ब्रँडिंग याची आवश्यकता आहे, त्यासाठी चांगली प्रगती साधण्याकरीता मदत व्हावी म्‍हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

दी लेक्‍सिकॉन ग्रूप ऑफ इन्स्‍टिट्यूशनस्‌ आणि मल्‍टिफिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी – नासीर शेख यांनी सांगितले की, भविष्‍यातील नेतृत्‍व तयार करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.

शिवाय या कार्यक्रमात लेक्सिकॉन सेंटर ऑफ एक्सलन्सचा हा एकात्मिक कार्यक्रम लेक्सिकॉन स्कूलचा भाग नसलेले विद्यार्थी देखील सहभाग घेऊ शकतात. लेक्सिकॉन शाळा आणि एकात्मिक शैक्षणिक कार्यक्रमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी https://lexiconedu.in/ या संकेस्थळावर भेट द्या. व याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी