29 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रवारीची परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्यात जे घडलं त्यांची वारीत पुनरावृत्ती होऊ...

वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्यात जे घडलं त्यांची वारीत पुनरावृत्ती होऊ नये; अजित पवार

टीम लय भारी

मुंबई :-  आषाढी वारीसाठी फक्त मानाच्या दहा पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच वारीसाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्यात जे घडलं त्यांची पुनरावृत्ती होऊ नये अजित पवार म्हणाले (Ajit Pawar said that the tradition of Wari should be maintained, but what happened in Kumbh Mela should not be repeated).

कुंभमेळ्यात जे घडलं ते आषाढी वारीबाबत घडू नये (What happened in Kumbh Mela should not happen in Ashadi Wari). यासाठी सर्वांशी चर्चा करून यंदाच्या आषाढी वारी सोहळ्याबाबत निर्णय घेतला आहे. परंपरा टिकली पाहिजे असे आम्हाला सुद्धा वाटते परंतु तिसऱ्या लाटेची पूर्वसूचना असताना त्याचाही विचार करणे आवश्यक आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटी संदर्भात नवाब मलिकांनी केला खुलासा

मुंबई व उपनगरात पुढील 48 तासात अतिवृष्टीची शक्यता!

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य सरकारने यंदाच्या वर्षीदेखील आषाढी पालखी सोहळा बसने होणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील मानाच्या १० पालखी सोहळ्याला ६० वारकऱ्यांसह १९ जुलैला पंढरपूरला जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर बारामती येथे माध्यमांशी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते.

अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, राज्य सरकारने सर्व चर्चा करुन पालखी सोहळ्याबाबत निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्षे चाललेली परंपरा टिकली पाहिजे, असे आम्हाला सुद्धा वाटते. परंतु सध्याच्या कोरोना सावटाचाही विचार आपल्याला केला पाहिजे. सर्व अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी सर्वांशी समन्वय साधत पालखी सोहळ्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

Kashmir: Two policemen, two civilians killed in militant attack in Sopore

वाखरीला गेल्यानंतर पुढे होणाऱ्या विधीसाठी शिथिलता देण्यात आली आहे. मागील वर्षी जसे निर्बंध होते, तसे आता निर्बंध लावलेले नाहीत. कुंभमेळ्याबाबत जे घडले तसे इथे घडू नये याची ही दक्षता घेणे आवश्यक आहे. आम्ही वारकरी सांप्रदायाच्या भावनांचा आदर करतो, राज्याचे आरोग्याचे हित याकडेही लक्ष दिले पाहिजे. तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने काही बाबतीत सर्व विचार करुनच निर्णय घ्यावा लागतो. आता ही वारकरी संप्रदायाच्या भावना तीव्र असतील, तर विभागीय आयुक्तांना सुचना देऊ. संबंधित मान्यवरांशी चर्चा करण्याबाबत सांगू, असेही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी