30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमुंबईउद्धव ठाकरे म्हणाले, चर्चा योग्य दिशेने; अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासोबत खलबतं

उद्धव ठाकरे म्हणाले, चर्चा योग्य दिशेने; अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासोबत खलबतं

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये वांद्रेतील हॉटेल ट्रायडंटमध्ये सत्ता स्थापण्यावरून खलबते झाली आहेत. चर्चा योग्य दिशेने सुरू आहे, असे उद्धव ठाकरे यांनी या बैठकीनंतर सांगितले.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशी नवीन महाशिवआघाडी सत्तास्थापन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भेटीगाठींचा सिलसिला जोरात सुरु आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्ध ठाकरे, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यांच्यामध्ये हॉटेलमध्ये बराच वेळ चर्चा सुरु होती. काल रात्री उद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात हॉटेल ट्रायडंटमध्ये भेट झाली होती. त्यानंतर आज राज्यातील नेत्यांची चर्चा सुरु झाली आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र सत्तास्थापन करणार आहेत. त्यामुळे किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरु झाली आहे. कालच उद्धव ठाकरे यांनी भाजवर तोफ डागली होती. तसेच राष्ट्रपती राजवटीवरून राज्यपालांनाही टोला लगावला होता.

तब्बल २० दिवसांच्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यातील प्रमुख पक्षांना सत्तास्थापनेचा पेच सोडवता न आल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तास्थापण्यावरून वेग आला आहे.

हे सुद्धा वाचा

स्थिर सरकारसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं हलाहलही पचवू – शिवसेना

… आणि शरद पवारांनी आमदारांचा हट्ट पुरवला

संजय राऊत डिस्चार्ज नंतर पुन्हा म्हणाले, मुख्यमंत्री शिवसेनेचाच !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी