30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeटॉप न्यूजराष्ट्रवादीचे सहा आमदार लंपास, इतर आमदारांना वाचविण्याचे प्रयत्न

राष्ट्रवादीचे सहा आमदार लंपास, इतर आमदारांना वाचविण्याचे प्रयत्न

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : अजित पवार यांचे समर्थन करणारे सहा आमदार विमानतळावरून अज्ञात ठिकाणी निघून गेले आहेत. यात प्रकाश सोळंके, अनिल पाटील, दौलत दरोडा, बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, नितीन पवार आदी आमदारांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. या सहा आमदारांना इतरत्र हलविण्यासाठी भाजपने पाठबळ पुरविले असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

राजभवनवर झालेल्या शपथविधीसाठी उपस्थित असलेल्या आमदारांपैकी 7 आमदार परत राष्ट्रवादीमध्ये परतले आहेत. धनंजय मुंडे व माणिकराव कोकाटे हे सुद्धा राष्ट्रवादीमध्ये परतले आहेत. त्यामुळे फुटलेले इतर आमदार परत राष्ट्रवादीमध्ये जाऊ नयेत म्हणून भाजपने जोरदार हालचाली केल्या. त्यांच्या या हालचालींना अल्पसे यश आले असून सहा आमदारांना अज्ञात ठिकाणी हलविण्यात आले आहे.

अन्य कोणताही आमदार फुटू नये यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते कामाला लागले आहेत. सगळ्या आमदारांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. या बैठकीत अजित पवार यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यानंतर सगळ्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येणार आहे. गेलेले सगळे आमदार परत आणण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जोरदार प्रयत्न करीत आहेत. शशिकांत शिंदे यांनी सुद्धा विमानतळावर जाऊन काही आमदारांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु शिंदे विमानतळावर पोचण्याअगोदर हे सहा आमदार अज्ञात ठिकाणी निघून गेले होते असे या सूत्रांनी सांगितले.

अजित पवारांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न

अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी गद्दारी केली असली तरी त्यांचे मन वळविता येईल का यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अजितदादा त्यांचे चुलते श्रीनिवास पवार यांच्या नेपियन्सी रोड निवासस्थानी मुक्कामी आहेत. त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, हसन मुश्रीफ व दिलीप वळसे पाटील हे अजितदादांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी अजितदादांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील बैठकीसाठीही त्यांना निमंत्रित करण्यात आले. पण या नेत्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यांनी परत येण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेना, काँग्रेसचे आमदारही सुरक्षित स्थळी

शिवसेना आमदार सध्या हॉटेल ललितमध्ये मुक्कामाला आहेत. तेथे आता शिवसैनिकांनी गस्त वाढविली आहे. शिवसेना आमदार फुटणार नाहीत यासाठी अधिक काळजी घेण्यात येत आहे. काँग्रेसने आपल्या आमदारांना भोपाळला हलविण्याची तयारी केली आहे.

हे आमदार परतले

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जे आमदार शपथविधीसाठी गेले होते, त्यातील बरेचजण आता परतले आहेत. यांत धनंजय मुंडे, डॉ. राजेंद्र शिंगणे, सुनील शेळके, सुनील भुसारा, दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ, संदिप क्षीरसागर यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीत, ना…बँड..ना बाजा.. ना..बाराती : अहेमद पटेल

शरद पवार यांना एका संतप्त कार्यकर्त्याचे पत्र

शरद पवारांची खेळी, अजित पवारांना एकटे पाडण्यासाठीचे प्रयत्न सुरू; अजित पवारांचा मुक्काम श्रीनिवास पवारांच्या घरात

अजित पवारांनी 54 आमदारांच्या सह्यांचे पत्रही पळवले

काकाने पावसात कमविले, पुतण्याने रातोरात गमावले : सोशल मीडियावर फटकेबाजी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी