30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeटॉप न्यूजराष्ट्रवादी आमदारांच्या हॉटेलमध्ये भाजपचे नेते, शरद पवारांचीही भाजपच्या खासदारांनी घेतली भेट

राष्ट्रवादी आमदारांच्या हॉटेलमध्ये भाजपचे नेते, शरद पवारांचीही भाजपच्या खासदारांनी घेतली भेट

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : पवई येथील हॉटेल रेनेसॉं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मुक्कामी आहेत. या हॉटेलमध्येच भाजपचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण पोहोचले आहेत, दुसऱ्या बाजूला भाजपचे खासदार संजय काकडे यांनी सुद्धा शरद पवार यांची आज सकाळीच भेट घेतली आहे.

शरद पवार यांच्याकडे माझे खासगी काम होते. त्यासाठी मी आलो होतो, असे खासदार काकडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. मात्र, रवींद्र चव्हाण हॉटेल रेनेसॉंमध्ये कशासाठी गेले आहेत, याबाबत अद्याप त्यांनी स्पष्ट केलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा मिळाविण्याचा खटाटोप करण्यासाठीच भाजपकडून प्रयत्न केले जात असावेत असे बोलले जात आहे. अजित पवार – शरद पवार यांच्यातील निरोपांची देवाण घेवाण, किंवा दोघांमध्ये समझौता घडवून आणण्यासाठीही खासदार काकडे यांनी प्रयत्न केला असावा असेही बोलले जात आहे. राष्ट्रवादीच्या काहीही आमदारांना भेटण्याच्या उद्देशाने रवींद्र चव्हाण हॉटेल रेनेसॉंमध्ये गेले होते की काय अशीही साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

जयंत पाटील राजभवनवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित विधीमंडळ पक्षनेते जयंत पाटील आज सकाळीच राजभवनवर पोहोचले. त्यांनी राज्यपाल कार्यालयामध्ये एक पत्र सादर केले आहे. या पत्रात अजित पवार यांना विधीमंडळ पक्षनेते पदावरून काढून टाकले असल्याबाबत नमूद केले असल्याचे समजते. या पत्रामुळे राज्यपालांसमोरही कायदेशीर पेच निर्माण होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होण्याअगोदरच जयंत पाटील यांनी राज्यपालांकडे हे पत्र पोचवले आहे. त्यामुळे या पत्राचा संदर्भ न्यायालयातील सुनावणीदरम्यान उपस्थित होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाणांनीही घेतली शरद पवारांची बैठक

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. राजकीय घडामोडींबाबत त्यांनी विस्तृत चर्चा केली. तसेच आमदारांना सुरक्षित ठेवणे, सर्वोच्च न्यायालयाचा संभाव्य निकाल व त्यानंतर करावयाच्या पुढील हालचालींबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

पृथ्वीराज चव्हाण, गजानन किर्तीकर सर्वोच्च न्यायालयात उपस्थित

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरू झाली आहे. कपिल सिब्बल व अभिषेक मनू सिंघवी हे याचिकाकर्त्यांचे वकिल आहेत. न्यायालयातील या सुनावणीवर देखरेख करण्यासाठी महाराष्ट्रातून शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर, तर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण सर्वोच्च न्यायालयात पोचले आहेत.

हे सुद्धा वाचा

http://laybhari.in/2019/11/24/hearing-at-supreme-court/

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी म्हणजे पाकिट मारणाऱ्या लोकांसारखच; राऊतांचं टिकास्त्रं

‘शरद पवार यांचा पक्ष फोडण्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील’

नव्या सरकारची थोड्याच वेळात न्यायालयात परीक्षा, कर्नाटकाप्रमाणे निकाल आल्यास भाजपसमोर डोकेदुखी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी