28 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeटॉप न्यूज...आता उद्धव ठाकरे असतील नवे मुख्यमंत्री, अजित पवारांनी घेतला राजकीय संन्यास

…आता उद्धव ठाकरे असतील नवे मुख्यमंत्री, अजित पवारांनी घेतला राजकीय संन्यास

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. आज सायंकाळी ५ वाजता उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी पत्रकारांना दिली.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी उद्धव ठाकरे यांच्या नावालाच पसंती दिली आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पूर्ण पाच वर्षे या पदावर कार्यरत राहतील. सायंकाळी ५ वाजता शिवसेना पक्षाची बैठक आहे. या बैठकीत उद्धव यांच्या नावाचा निर्णय घेण्यात येणार आहे.

उद्या, बुधवारी विधानसभेचे हंगामी सत्र होत आहे. यात देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमताच्या चाचणीला सामोरे जावे लागणार होते. पण अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे फडणवीस सरकारकडे बहुमत उरलेले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नवे मुख्यमंत्री असतील, असे बोलले जात आहे.

अजित पवार यांनी घेतला राजकीय संन्यास

राष्ट्रवादी काँग्रेसमधील सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी व नातलगांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. परंतु येथून पुढे मी राजकारणात राहणार नाही. मी राजकीय संन्यास घेत असल्याचेही त्यांच्या नातलगांना सांगितल्याचे सूत्रांकडून समजते.

हे सुद्धा वाचा

राजकीय भूकंप : अजित पवार यांनी राजीनामा दिला, प्रतिभाताई पवार यांच्यामुळे अजितदादांची माघार

काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी