27.4 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeटॉप न्यूजउद्या ९ मंत्र्यांचा शपथविधी होणार, सोनिया गांधींसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती

उद्या ९ मंत्र्यांचा शपथविधी होणार, सोनिया गांधींसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत प्रत्येक पक्षांचे किमान तीन असे एकूण ९ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनीच असा प्रस्ताव ठेवला आहे. त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज १२ वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे. या बैठकीत उद्याच्या मंत्रीमंडळ शपथविधीबाबत चर्चा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मंत्री ठरविण्याबाबत आता जोरदार खलबते सुरू झाली आहेत. त्या अनुषंगाने पवार यांच्या निवासस्थानी तिन्ही पक्षांचे नेते जमा होणार आहेत. यांत उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे, अहमद पटेल किंवा मल्लिकार्जून खर्गे, जयंत पाटील यांचा समावेश असेल. उद्याच्या शपथविधी सोहळ्यात सगळ्याच मंत्र्यांना सुरूवातीला शपथ दिली जाणार नाही. मोजकेच मंत्री उद्या शपथ घेतील. कालांतराने मंत्रीपदाचा विस्तार होईल, असे सूत्रांनी सांगितले.

भाजपला सत्तेबाहेर ढकलण्यामध्ये अन्य विरोधी पक्षांना यश आले आहे. देशभरात भाजपविरोधातील संदेश गेला आहे. त्यामुळे भाजपविरोधातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना या शपथविधी सोहळ्याला निमंत्रित केले जाणार आहे. सोनिया गांधी यांनाही निमंत्रित केले जाणार आहे. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, मायावती आदी नेत्यांना निमंत्रित केले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

शपथविधी उद्या, बहुमत चाचणी शुक्रवारी

मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या, गुरूवारी होणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार बहुमत चाचणीला लगेचच सामोरे जाणार आहे. शुक्रवारी बहुमत चाचणी घेतली जाणार आहे. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलाविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शपथविधीचा जंगी सोहळा

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मंत्रीपदाची गुपचूप शपथ घेतली होती. त्यामुळे देशभरात भाजपची नाचक्की झाली. परंतु महाविकास आघाडीच्या सरकारचा खुलेआम जंगी पद्धतीने शपथविधी सोहळा घेतला जाणार आहे. दादर येथील भव्य अशा शिवाजी पार्क मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार आहे. गुरूवारी, २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा सोहळा होणार आहे. सामान्य लोकांसाठी हा शपथविधी सोहळा खुला असेल असे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख बदलली, २८ नोव्हेंबरला होणार शपथविधी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी