31 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपमध्ये दीपिकाच्या भूमिकेमुळे दोन गट

भाजपमध्ये दीपिकाच्या भूमिकेमुळे दोन गट

लयभारी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : अभिनेत्री दीपिका पादुकोणने जेएनयूतील विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यानंतर भाजपच्या नेत्यांमध्ये दोन गट पडले आहेत. एक गट दीपिकाची पाठराखण करत आहे तर दुसरा गट विरोधी भूमिकेध्ये दिसत आहे.सोशल मीडियावर भाजपची मंडळी मोठ्या प्रमाणात विरोध करतांना दिसत असतांना केंद्रीय मंत्र्याने पाठराख केल्यामुळे भाजपमध्ये दोन गट असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

भाजपचे दिल्लीचे अध्यक्ष आणि अभिनेते मनोज तिवारी यांनी दीपिका देशभक्त सुपरस्टार असल्याचं म्हटलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनीही दीपिकाने कुठे जावं आणि जाऊ नये हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याला आमचा विरोध नाही. भाजप दीपिकाच्या सिनेमावर बहिष्कार टाकणार नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळे दीपिकावरून भाजपमध्येच दोन गट पडल्याचं स्पष्ट झालं आहे.

दीपिका पादुकोणने काल जेएनयूमध्ये जाऊन विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यावर भाजपचे दिल्लीतील प्रवक्ते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी टीका करताना दीपिकाच्या सिनेमावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं. भाजपचे खासदार रमेश बुधुडी यांनीही दीपिकावर टीका करताना दीपिका टुकडे टुकडे गँगची समर्थक असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर #BoycottChhpaak आणि #ISupportDeepika हे दोन्ही ट्रेंड सुरू झाले. भाजपच्या या भूमिकेवर चोहोबाजूने टीका सुरू झाल्यानंतर बग्गा यांच्या विधानावरून अंग झटकले आहे.

दीपिका कुठेही जाण्या-येण्यास स्वतंत्र…

भाजपचे नेते, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले,दीपिका भारताच्या स्वतंत्र नागरिक असल्या कारणाने दीपिका कुठेही जाण्या-येण्यास स्वतंत्र आहेत. कलाकारच नव्हे तर भारतातील कोणताही नागरिक देशात कुठेही जाऊ शकतो. आम्ही त्यांच्या सिनेमाच्या बहिष्काराचं समर्थन करत नाही. ते आमच्या संस्कृतीत बसत नाही, असं जावडेकर यांनी सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी