28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
HomeराजकीयTej Pratap Yadav: तेज प्रताप यादव व श्याम रजक यांचा राष्ट्रीय जनता...

Tej Pratap Yadav: तेज प्रताप यादव व श्याम रजक यांचा राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये धिंगाणा

श्याम रजक हे आरएसएस आणि भाजपचे एजंट असल्याचा आरोप करत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. रजक यांना सभेच्या वेळेबाबत विचारले असता त्यांनी उत्तरात शिवीगाळ सुरू केल्याचे तेज प्रताप यादव यांनी सांगितले.

बिहारचे वन आणि पर्यावरण मंत्री तेज प्रताप यादव रविवारी झालेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून बाहेर आले आणि पक्षाचे नेते श्याम रजक यांनी त्यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप केला. दिल्लीतील राजदची बैठक अर्धवट सोडून निघालेल्या तेज प्रताप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा आरोप केला. त्या संपूर्ण घटनेचा ऑडिओही आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारणा केल्यानंतर तेज प्रताप यादव म्हणाले की, शिवीगाळ ऐकण्यासाठी मी सभेत का थांबणार? श्याम रजकने मला शिवीगाळ केली आणि बहिणीलाही शिवीगाळ केली. त्याने माझ्या पीएलाही शिवीगाळ केली. माझ्याकडे त्याची ऑडिओ क्लिप असून ती मी सोशल मीडियावर व्हायरल करणार आहे.

यासोबतच त्यांनी श्याम रजक हे आरएसएस आणि भाजपचे एजंट असल्याचा आरोप करत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. रजक यांना सभेच्या वेळेबाबत विचारले असता त्यांनी उत्तरात शिवीगाळ सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

तेज प्रताप यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना श्याम रजक यांनी म्हटले आहे की, तेज प्रताप यादव काहीही म्हणोत. तो मोठा माणूस आहे आणि मी दलित माणूस आहे.

राजदच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये तीन प्रस्ताव मांडण्यात आले –

या बैठकीबाबत बोलताना आरजेडी नेते मनोज झा म्हणाले की, आम्ही बैठकीत तीन प्रस्ताव मांडले आहेत, त्यावर राष्ट्रीय अधिवेशनात चर्चा केली जाईल. लालू यादव, तेजस्वी यादव आणि शरद यादव यांनी दिलेल्या भाषणांचा अर्थ असा आहे की, सध्या भाजपकडून मूळ विषयांवरून लक्ष वळवण्यासाठी देशात वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. झा पुढे म्हणाले की, बिहारमधून सुरू झालेले वादळ संपूर्ण देशात पसरेल, आम्ही सर्व मतभेद विसरून हातमिळवणी केली आहे.

हे सुद्धा वाचा –

Baramati Election: बारामती जिंकण्याची ताकद फक्त महादेव जानकरांमध्येच, रासपचे भाजपला आव्हान !

Student Scholarships: ऑक्टोबर ते डिसेंबर च्या काळामध्ये विद्यार्थी या तीन शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज करू शकतात

Uddhav Thackeray Live : ’40 रावणांनी मिळून श्रीरामांचा धनुष्यबाण गोठवला’, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात

मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर टिपण्णी –

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातिव्यवस्थेवर भाष्य केले होते, त्यांच्या व्यक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मनोज झा म्हणाले की, ते स्वत: मनुवाद पसरवण्याचे काम करत आहेत आणि त्यांच्या तोंडून अशा प्रकारचे व्यक्तव्य चांगले दिसत नाही. मोहन भागवत यांना आधी संघटनेतील व्यवस्था बदलावी, मग इतरांना विचार करायला सांगावे.

दिल्लीत राजदची दोन दिवसीय बैठक होत असून आज पहिल्या दिवशी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी