प्राइम व्हिडिओचा ओरिजनल बहुप्रतिक्षित सीरीज ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’चा नवा सीजन 9 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अनोख्या ट्विस्ट टर्नने खच्चून भरलेल्या या सायकॉलॉजिकल-थ्रिलरमध्ये अभिषेक बच्चन आणि अमित साध पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिरीजमध्ये नित्या मेनन, सैयामी खेर आणि इवाना कौर त्यांच्या भूमिकांची पुनरावृत्ती करताना दिसणार असून, आपल्या ऍक्शन सिक्वेन्ससह ही सीरीज दर्शकांचे नक्कीच मनोरंजन करेल.
हे सुद्धा वाचा
SBI Bank Users : एसबीआयच्या ग्राहकांसाठी वाईट बातमी! आता ईएमआयमध्ये होणार वाढ
PM Jan Dhan Yojana : जन-धन योजनेतून आजवर 25 लाख कोटी रुपये वितरित केलेत! केंद्रीय मंत्र्याचे विधान
Yoga Tips : दुषित वातावरणाचा त्रास होतोय? ‘ही’ योगासने तुम्हाला फायदेशीर ठरतील
भारतातील प्राइम वीडियो ओरिजिनल्सच्या मुख्य अपर्णा पुरोहित म्हणतात, “ब्रीद: इनटू द शॅडोज या थ्रिलरचा सिरीजचा नवीन सीझन प्रदर्शित करताना आम्हाला आनंद होत आहे. एखाद्या शोच्या यशाचा पुरावा म्हणजे जेव्हा प्रेक्षक नव्या सीझनची मागणी करू लागतात. कथाकारांची आणि कलाकारांची एक उत्कृष्ट टीमद्वारा तयार करण्यात आलेल्या या सस्पेन्सफुल थ्रिलरचा नवीन सीझन आशा आणि चिंतेने ओतप्रोत असून, दर्शकांचे मनोरंजन होईल. अबुदंतिया एंटरटेनमेंटशी आमचा दीर्घकाळ संबंध आहे, ज्यांच्यासोबत आम्ही अनेक शो आणि चित्रपटांमध्ये सहयोग केला आहे, परंतु ‘ब्रीद’ फ्रँचायझी नेहमीच खास असेल कारण ती पहिली होती. ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’ सीझन 2 एक वेधक, सस्पेन्सफुल ड्रामा आहे ज्यामध्ये परिपूर्ण थ्रिलरचे सर्व पैलू असून, त्यांना उत्तम प्रकारे अंमलात आणले आहे.
10 heads, 1 mastermind 😈
the man who did it all for his family is back!#BreatheIntoTheShadows
new season, Nov 9@juniorbachchan #AmitSadh @MenenNithya @SaiyamiKher @nouwwwin #IvanaKaur @abundantia_ent @mayankvsharma @vikramix #NidhiAgarwal #VijashKothari @vikramtuli pic.twitter.com/Vb21OZr09O— prime video IN (@PrimeVideoIN) October 17, 2022
विक्रम मल्होत्रा आणि अबुदंतिया एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, आठ भागांची ही अमेझॉन मालिका मयंक शर्मा यांनी सह-निर्मित आणि दिग्दर्शित केली आहे. दिग्दर्शक मयंक शर्मा यांनी अर्शद सय्यद, विक्रम तुली, प्रिया सग्गी आणि अभिजित देशपांडे यांच्यासोबत ब्रीद: इनटू द शॅडोजच्या नवीन सीझनचे सह-लेखन केले आहे.