29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
HomeमुंबईCoronavirus : महापालिकेचा अजब फतवा, 'कोरोना' उपचाराचे बिल रूग्णांच्या माथी

Coronavirus : महापालिकेचा अजब फतवा, ‘कोरोना’ उपचाराचे बिल रूग्णांच्या माथी

टीम लय भारी

कल्याण : कोरोनाबाधित (Coronavirus) जर महापालिकेच्या अथवा महापालिकेने कोरोना उपचारासाठी अधिग्रहीत केलेल्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असेल तर त्याचे बिल कोरोना रुग्णालाच भरावे लागणार आहे. हे बिल कशा प्रकारे आकारले जाईल, त्याचे दरपत्रकच कल्याण डोंबिवली महापालिकेने जाहीर केले आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या रुग्णाला आता मोफत उपचार मिळण्याची आशा मावळली आहे.

सर्व पिवळे व केशरी रंगाचे रेशनकार्ड असलेल्या कोरोना बाधितांना महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांव्यतिरिक्त उपचार घेत असलेल्या अन्य कोरोना रुग्णांचा खिसा खाली होणार आहे. दुसरीकडे आरोग्यमंत्री यांनी 1 मे रोजी मोफत उपचार केले जाणार अशी घोषणा केली होती. त्याचे काय झाले, असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे.

रेशन कार्डचा रंग बघून उपचार देणार का, असा प्रश्न मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे. सर्वांना मोफत उपचार दिलेच पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिकेने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी शुल्क आकारणीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा याकरिता आदेश देण्याची मागणी कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

असे असतील प्रतिदिन दर…

1. जनरल वार्ड-2800 रुपये.
2.शेअर रुम -3200 रुपये.
3. सिंगल रुम-3800
4.अतिदक्षता विभाग-5000

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी