27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रPolitics : भाजप खासदाराच्या मुलाने औषध फवारणी करणा-याला बदडले

Politics : भाजप खासदाराच्या मुलाने औषध फवारणी करणा-याला बदडले

टीम लय भारी

औरंगाबाद : भाजपचे (BJP Politics) प्रदेश उपाध्यक्ष, राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांच्या दोन मुलांनी (हर्षवर्धन आणि वरूण) (Harshavardhan and Varun) भाजपच्या युवा मोर्चाचे कार्यकारणी सदस्य कुणाल मराठे (Kunal Marathe) यांना काल रात्री घरात घुसून मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.

याप्रकरणी कुणाल मराठे याने केलेल्या तक्रारीनुसार हर्षवर्धन कराड व त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुणाल मराठे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कुणाल हा घरी जेवत असताना, खासदार कराड यांचा मुलगा हर्षवर्धन व वरूण तसेच पवन सोनवणे हे घरी आले. तसेच ‘तू कोणाला विचारुन वॉर्डात जंतूनाशक औषध फवारणी केली, यापुढे जे काही करायचे आहे ते आम्ही करू, तू वॉर्डात फिरायचे नाही, लोकांना मदत करायची नाही, कुठलेही काम करायचे नाही’, असे म्हणत त्यांनी सोबत आलेल्या कार्यकर्त्यांसह आपल्यावर हल्ला चढवला तसेच शिवीगाळही केली. तसेत काठी व बॅटने मारहाण करीत जखमी करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच यावेळी मारामारी सोडवण्यास आलेल्या आपल्या आईवडिलांनाही धक्काबुक्की केल्याचे कुणालने सांगितले.

कोटला कॉलनीच्या वॉर्डातुन मला तिकीट मिळत असल्याने तसेच वार्डात मी लोकांना मदत करत असल्यानेच या तिघांनी मला मारहाण केल्याचे कुणाल यांनी तक्रारीत म्हटले आहे. हर्षवर्धन कराड यांच्याकडून मला व माझ्या कुटुंबियांना धोका असल्याचेही कुणाल यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारीनुसार क्रांती चौक पोलीस ठाण्यात रात्री उशिरा हर्षवर्धन व वरूण कराड, पवन सोनवणे यांच्याविरोधात मारहाण व धमकी दिल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मारहाणीचा व्हिडिओ मोबाइलमध्ये चित्रित करण्यात आला आहे. २५ सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये कुणाल मराठे यांना हर्षवर्धन आणि अन्य कार्यकर्ते मारहाण करताना दिसत आहे. त्यांचे कुटुंबीय त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओच्या पुराव्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तर दुसरीकडे, कोटला कॉलनी येथे गरजूंना किराणा किट वाटपाचे काम पवन सोनवणेसह अन्य कार्यकर्ते करत आहेत. माझा मुलगा हर्षवर्धनही त्यांच्यासोबत होता. वाटप सुरू असताना कुणाल मराठे यांच्या घरीही किट हवी का, अशी विचारणा कार्यकर्त्यांनी केली. त्याचा राग येऊन कुणाल याने पवन यास अपशब्द वापरले. त्यातून वादावादी झाली. हा वाद सोडण्यासाठी माझा मुलगा हर्षवर्धन याने प्रयत्न केला, अशी माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष खासदार डॉ. भागवत कराड यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी