28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्री शंभूराज देसाई यांचे आजोबाप्रेम; बाळासाहेब देसाई यांच्यावरील चरित्र ग्रंथाचे राजभवनावर प्रकाशन...

मंत्री शंभूराज देसाई यांचे आजोबाप्रेम; बाळासाहेब देसाई यांच्यावरील चरित्र ग्रंथाचे राजभवनावर प्रकाशन !

महाराष्ट्राच्या मातीशी एकनिष्ठ असा लोकनेता म्हणून परिचीत असेले नाव म्हणजे बाळासाहेब देसाई. राज्याच्या राजकारणात एकेकाळी मोठा दबदबा असलेले हे नेते, तत्वनिष्ठ राजकारणी म्हणून असलेली ओळख, राज्याच्या कानाकोपऱ्याचतील समस्यांची जाण असलेला अफाट कर्तृत्त्वाचा नेता. तसेच विद्यमान राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे आजोबा बाळासाहेब देसाई यांच्यावरील ”दौलत” हा चरित्रग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. बाळासाहेब देसाई यांच्या वैयक्तिक, सामाजिक, राजकीय जीवनपट या ग्रंथरुपाने वाचकांच्या समोर येत आहे.

दौलत या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा बुधवारी (दि. ७) रोजी मुंबईत राजभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडणार आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.

दौलतराव श्रीपतराव देसाई उर्फ बाळासाहेब देसाई यांनी राज्याच्या राजकारणात मोठे कार्य केले, त्यांनी पाटबंधारे विभाग, शिक्षण, शेती तसेच गृहखात्याचे मंत्रीपद देखील सांभाळले होते. त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून जसा झपाटून काम करण्याचा पिंड होता, तसाच स्वच्छ राज्य कारभाराचा देखील दंडक होता. त्यांच्या याच व्यक्तीमत्त्वामुळे प्र. के. अत्रे यांनी त्यांना ‘लोकनेता’ म्हणून गौरविले होते.

बाळासाहेब देसाई यांचा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील जन्म. स्वातंत्र्यपूर्व काळात 1940 साली लोकल बोर्डावर ते निवडून आले. जनतेचे प्रश्न हिरीरीने मांडणारा, सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडून असणारा हा नेता महाराष्ट्राच्या विधानसभेवर पहिल्यांदा 1952 साली निवडून आला. त्यानंतर पुढच्या पंचवार्षिक निवडणूकीत देखील ते विजयी झाले. त्यानंतर त्यांना मंत्रीपद देखील मिळाले. 1960 साली ते राज्याचे शिक्षणमंत्री झाले.

ग्रामिण भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा ग्रामिण भागातील मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी त्यांचा आग्रह होता. त्यासाठी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. केवळ भूमिकाच पार पाडली असे नव्हे तर विद्यापीठ स्थापनेच्या फाईलवर मुख्यमंत्र्याची सही घेईपर्यंत त्या गोष्टीचा पाठपूरावा केला. गोरगरीब विद्यार्थ्यांना देखील शिक्षण घेता यावे म्हणून ईबीसी फी सवलतीचे देखील त्यांनी निर्णय घेतले.

देसाई यांनी शेती खाते देखील समर्थपणे सांभाळले. त्याच बरोबर अत्यंत जबाबदारीचे खाते असलेले गृह खाते देखील त्यांनी तेवढ्याच उत्तमपणे सांभाळले. राज्याचे पोलीस प्रशासन बळकट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कोयनेच्या भूकंपाच्या वेळी देखील त्यांनी पुनर्वसनासाठी मोठे कार्य केले. त्यावेळी त्यांनी केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. धेय्यवेडा राजकारणी अशी त्यांची ओळख होती. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले होते. 1978 ते 1979 या काळात ते विधानसभेचे अध्यक्ष होते.

हे सुद्धा वाचा

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. रवींद्र कुलकर्णी; तर पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियु्क्ती

देशात मुस्लिम, ख्रिश्चन समाजाविषयी चिंता वाटावी असे चित्र – शरद पवार 

बाल शिवाजीचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला,आकाश ठोसर मुख्य भूमिकेत

ग्रामीण भागात विकासाची गंगा वहावी यासाठी बाळासाहेब देसाई यांनी प्रयत्न केले. सहकार क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले. शेतकऱ्यांची उन्नती व्हावी म्हणून त्यांनी साखर कारखान्याची देखील उभारणी केली. तालुक्यातील मुलांना शिक्षणासाठी त्यांनी पाटणमध्ये महाविद्यालय देखील सुरु केले होते, अशा या लोकनेत्याचे कार्य आणि कर्तृत्त्व दौलत या चरित्रग्रंथाव्दारे उलगडणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी