27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रSocialwork : पत्रकाराच्या सतर्कतेमुळे जालना जिल्ह्यातील मजूरांची २०० किलोमीटरची पायपीट थांबली

Socialwork : पत्रकाराच्या सतर्कतेमुळे जालना जिल्ह्यातील मजूरांची २०० किलोमीटरची पायपीट थांबली

टीम लय भारी

अहमदनगर : सातारा जिल्ह्यातील वाई येथून जालना जिल्ह्यातील आपल्या गावी पायी निघालेल्या मजुरांना जामखेडमध्ये प्रशासनाने अडवले व या मजुरांच्या गावी जाण्यासाठी नियोजनाचे चक्रे फिरली. जामखेडमधील पत्रकार अशोक निमोणकर यांनी अहमदनगर येथील ‘युवान’ या सामाजिक संस्थेमार्फत व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने (Social Work) जालना जिल्ह्य़ातील २५ मजुरांना घरपोच पाठवण्याची व्यवस्था करत त्या मजुरांची भर उन्हात होणारी दोनशे किलोमीटरची पायपीट थांबवली. तसेच बसरवाडी येथे दोन महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्य़ातील १६ मजुर लॉकडाऊनमुळे अडकुन पडलेले होते. त्यांनाही बसने मायदेशी पाठवण्यात आले. जामखेडचे पत्रकार अशोक निमोणकर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Socialwork : पत्रकाराच्या सतर्कतेमुळे जालना जिल्ह्यातील मजूरांची २०० किलोमीटरची पायपीट थांबली

वाई ( जिल्हा सातारा) येथून १८ मजुर ७ लहान मुलांसह पायी चालत जामखेडच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना मिळाली होती. माहिती मिळताच पाटील यांनी त्या मजुरांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोर असलेल्या झाडाखाली थांबवून ठेवले व तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना माहिती दिली. पत्रकार अशोक निमोणकर यांनी मजुरांची भेट घेऊन कोठून आले, कसे आले विचारताच त्यांच्या डोळ्यात पाणी आले.आम्ही जालना जिल्ह्य़ातील मंठा तालुक्यातील टोकेवाडी व पाटोदा येथील रहिवासी असून पोटासाठी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मजुरीसाठी गेलो होतो. केबल खोदणे, बांधकामसाठी बिगारी तसेच शेतक-यांच्या शेतात काम करून उपजिवीका करतोत. कोरोना महामारीमुळे मागील दोन महिन्या पासून लॉकडाऊन असल्यामुळे हाताला काम नाही व पैसे संपल्याने गावी पायी जाण्याचा निर्णय घेतला.

Mahavikas Aghadi

पोलिसांना चुकवीत वाई येथून १८ मोठे व लहान आठ मुलासह पायी प्रवास दररोज पहाटे चार पासून सुरू करुन अकरा वाजेपर्यंत करतो व सायंकाळी पाच ते नऊ असा दोनशे कि. मी. प्रवास करीत आहोत, आम्हाला आमच्या गावी जायचे एवढेच ध्येय आहे. मजुरांचे म्हणणे ऐकल्यानंतर निमोणकर यांनी अहमदनगर येथील युवान सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप कुसाळकर यांना याबाबत माहिती दिली. संदिप कुसाळकर यांनी आपले सहकारी सुरेश मैड, हेमंत लोहगावकर, पांडुरंग काळे, आदर्श ढोरजकर, ऍड विनायक सांगळे, कार्पे औरंगाबादच्या नताशा झरीन यांच्याबरोबर चर्चा करून तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना परवानगी मागितली त्यांनी बुलढाणा जिल्ह्य़ातील लोणार येथील १६ मजूर असून तालुक्यातील बसरवाडी येथे पाल ठोकून राहत आहेत त्यांना पण गावी जायचे आहे त्यांची आरोग्य तपासणी केली आहे पण शासनाकडून बसची व्यवस्था नाही तुम्ही करावी असा शब्द युवानचे अध्यक्ष संदीप कुसाळकर यांना टाकला त्यांनी तात्काळ होकार दिला व खर्डा येथील बसची व्यवस्था केली.

Socialwork : पत्रकाराच्या सतर्कतेमुळे जालना जिल्ह्यातील मजूरांची २०० किलोमीटरची पायपीट थांबली

नायब तहसिलदार नवनाथ लांडगे, विजय गव्हाणे यांनी प्रशासकीय बाबी तात्काळ पूर्ण केल्या. तोपर्यंत रात्रीचे सात वाजले होते. शिवप्रतिष्ठानचे पांडुराजे भोसले यांनी मजुरांना सकाळी व रात्रीही जेवण पुरवले. यानंतर सर्व सामान भरून रात्री एकच्या सुमारास सर्व मजूरांना तहसीलदार विशाल नाईकवाडे, पत्रकार अशोक निमोणकर यांनी रवाना केले. बस बीड हद्दीत जाताच परवाना असूनही त्यांना सोडले नाही त्यामुळे रात्री दोनच्या सुमारास बस पुन्हा जामखेड, हळगाव, चोंडी, नगर औरंगाबाद, जालना व मंठा तालुक्यातील टोकेवाडी व पाटोदा येथे बसचालक राजू सय्यद व गणेश पवार यांनी सोडले व उर्वरित १६ मजुरांना लोणार येथे घरपोच सोडले. दहा तासाच्या प्रवासानंतर सर्व मजुर सुखरूप घरी पोहचले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी