27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री ग्वाल्हेरवरून आले आणि सकाळी सकाळी कार्यक्रमाला नवी मुंबईत...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री ग्वाल्हेरवरून आले आणि सकाळी सकाळी कार्यक्रमाला नवी मुंबईत पोहचले

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर दिवसातील जास्त जास्त काम करणारे नेते आहेत. मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ग्वाल्हेर येथे केंद्रीयमंत्री तोमर यांच्या कुटुंबातील लग्नास गेले. हे लग्न झाल्यावर ते बुधवारी रात्री ३ वाजता घरी परतले.

सकाळी सहा वाजता नवी मुंबईत उलवे, सेक्टर 12, नोडे उलवे, नवी मुंबई या ठिकाणी एकूण दहा एकर परिसरात साकारण्यात येणाऱ्या तिरूमला तिरुपती देवस्थानाच्या श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.

हा कार्यक्रम झाल्यावर त्यांनी नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आढावा घेतला. यानंतर ते दिवसभर विविध कार्यक्रमात व्यस्त होते. रात्री उशिरापर्यंत ते अधिकारी, कार्यकर्ते यांच्याबरोबर बैठका घेत व्यस्त होते.

हे सुद्धा वाचा

PWD च्या माध्यमातून होणारी कामे देशासाठी समर्पित असतात : मंत्री रविंद्र चव्हाण

मुंबईत वसतीगृहातील मुलीसोबतच्या दुर्देवी घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले

जपानी नागरिक पैसे देऊन घेतायत हसण्याचे धडे; जाणून घ्या काय आहे नेमकं कारण,…  

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार घेऊन शिवसेनेत बंड केल्यावर शिवसेनेकडून त्यांच्यावर दररोज टीका होत आहे. कधी मिंधे, कधी गद्दार अशा टिकांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. असे असतानाही मुख्यमंत्री शिंदे दिवसरात्र काम करत आहेत. गतिमान पद्धतीने सरकार कशी वाटचाल करेल हे ते पाहत असतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी