27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रविठूरायाची वारी झाली डिजिटल; वारी चुकेल्या वारकऱ्यांना आता घरीच मिळणार दर्शन

विठूरायाची वारी झाली डिजिटल; वारी चुकेल्या वारकऱ्यांना आता घरीच मिळणार दर्शन

पंढरीचा विठोबा हे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, साध्याभोळ्या वारकऱ्यांसाठी विठू माऊलीचीचे नाम देखील अलौकीक भक्तीची अनुभूती देणारा हा पांडूरंग… आषाढी, कार्तिकीला वारकऱ्यांचा मोठा मेळा चंद्रभागेच्या वाळवंटी विठोबाच्या भेटीला येत असतो. आज पासून आषाढीवारीची सुरुवात होत आहे. जगदगुरू तुकोबारायांची पालखी देहूतून आज पंढरीकडे प्रस्थान करत आहे. वारीची ओढ प्रत्येक वारकऱ्याला असतेच, मात्र काही कारणांमुळे कधीतरी वारी चुकते. मात्र आता वारी चुकली तरी घर बसल्या वारीची अनुभूती विठूरायांच्या भक्तांना घरातबसून घेता येणार आहे. कारण यंदा पांडूरंगाची वारी डिजीटल स्वरुपात होत आहे.

ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांच्या पालख्यांचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होत आहे. हजारो वारकरी या पालख्यांसोबत वारीमध्ये सहभागी होत आहेत. यंदा मात्र या वारीला डिजीटलस्वरुप मिळाले आहे. त्यामुळे अखंड महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील विठूरायाच्या भक्तांना घरबसल्या वारीची अनुभूती घेता येणार आहे. घरबसल्या पालख्यांचे दर्शन घेता येणार आहे.

यंदा पालख्यांना जीआरएस कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे विठूरायाच्या भाविकांना केवळ QR कोड आपल्या फोनमध्ये स्कॅन करुन पालखीसोहळा पाहता येणार आहे. भाविकांना फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइनचा QR कोड स्कॅन करून संपूर्ण वारी सोहळा घर बसल्या पाहता येणार आहे.

तुकोबारायांच्या पालखीचे आज (दि.10) रोजी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. त उद्या रविवारी 11 जूनला ज्ञानोबांची पालखी आळंदीहुन पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. 12 जूनला संत श्री. तुकाराम महाराज आणि संत श्री. ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालाख्या पुण्यामध्ये एकत्रित येणार आहेत. पालखीमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पुणे शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

हे सुध्दा वाचा:

सीईटीचा निकाल ‘या’ दोन संकेतस्थळांवर पाहायला मिळणार !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळेंची निवड; अजित पवारांकडे कोणतीच जबाबदारी नाही

वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीचा साखरपुडा संपन्न, या बड्या अभिनेत्यांनी लावली उपस्थिती

मुंबई, सोलापूर आणि अहमदनगर दिशेने येणाऱ्या सर्व जड वाहनांवर बंदी घालण्यात येणार असून पालखी सोहळा सुरू असताना वाहतूक नियमांसाठी पुणे शहरात 100 कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. पालखीचे लाईव्ह लोकेशन जाणून घेण्यासाठी पालखी मधील काही वाहनांवर जीपीएस प्रणाली बसवण्यात येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी