28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeएज्युकेशनसीईटीचा निकाल जाहीर, २८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल !

सीईटीचा निकाल जाहीर, २८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल !

पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) आणि पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) गटांसाठी एमएचटी सीईटीचा निकाल 2023 आज सकाळी 11 वाजता cetcell.mahacet.org वर जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (CET) 2023 साठी बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे निकाल तपासून आणि डाउनलोड करू शकतील. 9 मे ते 20 मे 2023 या दरम्यान अभियांत्रिकी, कृषी आणि फार्मसीमध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रम करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी MHT-CET परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत 6.36 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

पीसीएम गट परीक्षा 9 मे 2023 ते 14 मे 2023 आणि पीसीबी गट परीक्षा 15 मे 2023 ते 20 मे 2023 या कालावधीत घेण्यात आली. नोंदणीकृत उमेदवारांपैकी, पात्र 5,91,130 विद्यार्थी परीक्षेला बसले, परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या टक्केवारी 92.93% इतकी प्रभावी ठरली. एमएचटी सीईटी परीक्षेत राज्यातील 28 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत.गेल्यावर्षी 2022 मध्ये एमएचटी सीईटीसाठी एकूण 6 लाख 04 हजार 780 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

हे सुध्दा वाचा :

२० पोलिसांनी ४ वारकऱ्यांना एका खोलीत नेऊन बेदम मारले

सामन्यादरम्यान अजिंक्य आणि शार्दुलचे मराठीत संभाषण व्हायरल

विठूरायाची वारी झाली डिजिटल; वारी चुकेल्या वारकऱ्यांना आता घरीच मिळणार दर्शन

निकाल कुठं पाहणार?

भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, गणित म्हणजे पीसीएम आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र अर्थात पीसीबी या दोन्ही विषयांसाच्या ग्रुपचे निकाल जाहीर झाले आहेत. एमएचटी सीईटीचा निकाल cetcell.mahacet.org आणि mhtcet2021.mahacet.org या दोन अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल. तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही वेबसाईटला भेट देऊन तुमचा निकाल पाहू शकता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी