27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयहारतुरे नको, शालेय साहित्य द्या रे मला.....मनसे ...

हारतुरे नको, शालेय साहित्य द्या रे मला…..मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेते मंडळींचा वाढदिवस उत्साहात साजरा केला जातो. अनेकजण ओल्या पार्ट्या करून वाढदिवस साजरा करतात. लावणीचा कार्यक्रम लावूनही नेत्याचा वाढदिवस साजरा करतात. तर आपल्या लाडक्या नेत्याला खुश करण्यासाठी अनेकजण महागडे हारतुरे घेउन येत असतात. दुसऱ्या दिवशी या फुलांचे निर्माल्य होते. त्यासाठी खर्च केलेला पैसाही वाया जातो. पण आता अनेकजण वाढदिवसाला हारतुरे न स्वीकारता शालेय साहित्य देण्याचे आवाहन करतात आणि वाढदिवसानिमित्त आलेल्या वस्तू गरिबांना दान करतात. असे सगळे काही असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असून या दिवशी भेटायला येणाऱ्यानी हारतुरे न आणता झाडाचं रोप किंवा शालेय साहित्य द्या, असे आवाहन केले आहे. राज्यात विधान सभेचे २८८ , विधान परिषदेचे ७८ आमदार तर ४८ खासदार आहेत. जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत पातळीवर यापैकी एकाचा वाढदिवस प्रतिदिन , आठवड्याला असतो. प्रत्येकाने असाच राज ठाकरे यांच्यासारखा उद्दात्त विचार केल्यास गरिबांची मुले चांगले शिक्षण घेतील. अशी चर्चा आहे.
काय आवाहन केले राज ठाकरे यांनी?

हे सुध्दा वाचा:

गदर 2 चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर, भारत विरुद्ध पाकिस्तान या दिवशी येणार आमनेसामने

सीईटीचा निकाल जाहीर, २८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल !

राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले, दरवर्षी राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. पण या वर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणले ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे.
नाका तिथे शाखा
प्रत्येक शहरात नाका तिथे शाखा हा उपक्रम सुरु करण्याची सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जनसंपर्क वाढावा म्हणून राज ठाकरेंनी नाका तिथे शाखा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. नाका तिथे शाखा हा खरे तर शिवसेनेचा पूर्वीपासूनच अजेंडा आहे. त्यामुळे आज राज्यातील खेडोपाडी शिवसेनेच्या शाखा आहेत. त्यातून शिवसेनेचे 80 टक्के राजकारण आणि 20 टक्के समाजकारण चालत असते. सत्तान्तर झाल्यावर शिंदे गटाच्या शिवसेनेने ठाण्यातील अनेक शाखा बाळकावल्या आहेत. शिवसेनेतील कार्यकर्ते हे भांडण, शाळेत, महाविद्यालयात प्रवेश आणि अनेक बाबीची सोडवणूक तिथे बसून करत असतात त्यामुळे शाखा या शिवसेनेसाठी जीव की प्राण आहेत. लोकसंपर्क वाढवण्यासाठी त्या आवश्यक असल्याने राज ठाकरे यांनी आता प्रत्येक शहरात नाका तिथे शाखा हा उपक्रम सुरु करण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी