27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रबिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरातला धोका, 67 रेल्वे गाड्या रद्द

बिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरातला धोका, 67 रेल्वे गाड्या रद्द

बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्र खवळला आहे. या वादळामुळे जोरदार वारे वाहत आहेत.हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने वाहताना दिसत आहे.चक्रीवादळ सुमारे 48 तासांनी भारतातील गुजरात आणि पाकिस्तानच्या कराचीच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या महितीनुसार चक्रीवादळ 15 जूनच्या संध्याकाळपर्यंत जखाऊ बंदराजवळील सौराष्ट्र आणि कच्छ पार करणार आहे. गुजरात किनारपट्टीवरील भागात ऑरेंज अॅलर्ट सांगण्यात आले आहे.बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या 67 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.

चक्रीवादळासाठी पूर्वतयारी म्हणून रेल्वे मंत्रालयाकडून वादळामध्ये अडकलेल्या प्रवाशांना याबाबतचा कोणताही त्रास होणार नाही. प्रवाशांना रस्त्याने नेण्यासाठी राज्य सरकारच्या बसेस आणि रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.स्थानकांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल पुरेशा साठ्यासह उघडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्यामुळे या वादळामध्ये अडकलेल्या प्रवाशांना याबाबतचा कोणताही त्रास होणार नाही. प्रवाशांना रस्त्याने नेण्यासाठी राज्य सरकारच्या बसेस आणि रुग्णवाहिकांचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. गुजरात किनारपट्टी भागातील शाळा आणि बंदरे बंद करण्यात आली.

मुंबई किनारपट्टी भागात बुधवारी देखील वाऱ्यांचा वेग ताशी 40-50 किलोमीटर दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तसेच चक्रीवादळामुळे 14 जून आणि 15 जून दरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. चक्रीवादळामुळे हे सर्व जिल्हे प्रभावित होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. मोखा नंतरच सर्वात शक्तिशाली असणारे बिपरजॉय चक्रीवादळ आहे.

हे सुध्दा वाचा :

मंत्री मंगलप्रभात लोढांचा मोठा निर्णय; 60 हजार बालकांना दरमहिना मिळणार 2500 रुपये

हारतुरे नको, शालेय साहित्य द्या रे मला…..मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर, भारत विरुद्ध पाकिस्तान या दिवशी येणार आमनेसामने

अरब महासागरामध्ये ६ जून रोजी चक्रीवादळ आले. या चक्रीवादळाला बिपरजॉय नाव दिले. बिपरजॉय हा शब्द बंगाली आहे. त्याचा अर्थ संकट होते. बिपरजॉय हे नाव बांगलादेशने दिले. बिपरजॉयमुळे यंदा मान्सूनला उशीर झाला. नेहमी केरळमध्ये १ जून रोजी येणार मान्सून ८ जून रोजी आला. त्यानंतर राज्यात ११ जून रोजी मान्सून दाखल झाला असला तरी अजून संपूर्ण महाराष्ट्र व्यापला नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी