27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रजुहूच्या समुद्रात पोहायला गेलेली सहा मुले बुडाली ; दोघांना वाचवण्यात यश,दोन मृत...

जुहूच्या समुद्रात पोहायला गेलेली सहा मुले बुडाली ; दोघांना वाचवण्यात यश,दोन मृत तर दोघांचा शोध सुरु

राज्यात बिपरजॉय चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला असुन मुंबई मधील सर्व समुद्रकिनारे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत.तरीही मुंबईच्या जुहू बीचवर काल संध्याकाळी पोहायला गेलेली सहा मुले या चक्रीवादळाच्या तडाख्याला बळी पडली आहेत.12 जून रोजी संध्याकाळी जुहू बीचवर पोहायला गेलेली सहा मूले समुद्रात बुडाली. या सहा मुलांपैकी दोन मुलांचा जीव वाचवण्यात लाइफगार्ड ना यश आले आहे व बाकी उर्वरित चार मुलांचा शोध सुरू आहे.समुद्रात बुडालेली ही मुले सांताक्रूझ पूर्व वाकोला येथील दत्त मंदिर परिसरातील रहिवासी आहेत.

 

हे सुध्दा वाचा: 

बिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरातला धोका, 67 रेल्वे गाड्या रद्द

मंत्री मंगलप्रभात लोढांचा मोठा निर्णय; 60 हजार बालकांना दरमहिना मिळणार 2500 रुपये

हारतुरे नको, शालेय साहित्य द्या रे मला…..मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

काल संध्याकाळी धर्मेश भुजियाव (15 वर्ष ),शुभम भोगनिया (16 वर्ष ),जय ताजभरिया (16वर्ष ),भाई मनीष (15 varsh) व दीपेश करण (16 वर्ष ) हे आपल्या मित्रांसोबत समुद्र किनारी फिरायला आले होते. हा आठ जनांचा ग्रुप जुहू कोळीवाड्याच्या समुद्रकिनारी पोहायला आले असता तिथे तैनात असलेल्या 4 लाइफगार्ड ने त्यांना समुद्रात जाण्यापासून मनाई केली असतानाही त्या ग्रुप मधील आठ मधील सहा मुले समुद्रात पोहायला गेली.समुद्रातील लाटांच्या जोरदार प्रवाहामुळे हे सहाजण बुडू लागले.त्या वेळी तिथे असलेल्या लाइफगार्ड च्या सर्तकतेमुळे त्या पैकी दोन जनांना वाचवण्यात यश आले आहे व चार मुल खोल समुद्रात बुडाली त्यातील एकाचा मृतदेह रात्री तर एक मृतदेह पहाटेच्या सुमारास सापडले आहेत. उर्वरित दोन मुलांसाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी,मुंबई पोलिस,बीएमसी कर्मचारी,लाइफगार्ड यांची शोध मोहीम सुरू आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी