27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई- पुणे एक्सप्रेसवर मोठा अपघात, ऑइल टॅंकरला आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

मुंबई- पुणे एक्सप्रेसवर मोठा अपघात, ऑइल टॅंकरला आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

मुंबई- पुणे एक्सप्रेस वर मोठा अपघात झाला आहे. खंडाळा घाटात ऑइल टॅंकरला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. एक्स्प्रेसवेवरील पुलावर एक केमिकल टॅंकर जलद गतीने जात असताना टॅंकरने पेट घेतला आहे. ही आग विझवण्यास यश आले आहे. केमिकल टॅंकर पुलावर असताना लागलेल्या या आगीमुळे पुलाखालून जाणाऱ्या गाड्यांची हानी झाली आहे. पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक हळूहळू सोडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र मुंबईकडे जाणारी वाहतूक अजूनही बंदच आहे.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या टॅंकरच्या चालकाचा ताबा सुटला. यामुळे टॅंकर रस्त्यावर आडवा झाला. त्यामधले केमिकल रस्त्यावर पसरुन त्यामुळे खालून जाणाऱ्या मार्गावर ही केमिकल पसरले. त्यानंतर टॅंकरला आग लागली.या टँकरमध्ये मिथाईल केमीकल होतं. खालच्या मार्गावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर केमिकल सांडले.यात ते होरपळले. या आगीच्या ज्वाळा दूरवरुन दिसत आहेत. पुलाखाली दोन ते तीन गाड्याही आगीला सामोरे गेले आहेत.यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. ब्रिजच्या खाली गावातील प्रवासी होते. त्यांच्या कामासाठी जात असावे. लागलेल्या आगीचा गोळा त्यांच्या अंगावर पडला त्यामुळे दोन मुलं आणि एक महिला जखमी झाली आहे. तिघांवरही उपचार सुरु आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

हे सुध्दा वाचा:

जुहूच्या समुद्रात पोहायला गेलेली सहा मुले बुडाली ; दोघांना वाचवण्यात यश,दोन मृत तर दोघांचा शोध सुरु

जानू भोये नगरमधील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडीधारकांच्या घराचे स्वप्न साकार

बिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरातला धोका, 67 रेल्वे गाड्या रद्द

बचावकार्य युध्दपातळीवर सुरु असून सध्या वाहतूक लोणावळा शहरातून वळविण्यात आली आहे. एक्स्प्रेस -वेवर मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे बचावकार्य वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी