27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रबिपरजॉय चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरुन पुढे सरकलं, गुजरातकडे कूच

बिपरजॉय चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरुन पुढे सरकलं, गुजरातकडे कूच

बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान विभागाने नवीन अपडेट दिली आहे. चक्रीवादळ हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरुन पुढे सरकून गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा वेग मंदावला आहे, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. गुजरातसह महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा परिणाम दिसणार आहे. येत्या २४ तासांत हे चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळ हे भारताच्या पश्चिम किनाऱ्याकडे पुढे सरकत जाताना दिसत आहे. गुजरातच्या कच्छ आणि मांडवी भागात मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात आणि पाकिस्तानच्या कराची दरम्यान आदळण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे की, बिपरजॉय वादळाचा वेग गेल्या सहा तासांत मंदावला आहे. बिपरजॉय वादळ सध्या ईशान्य अरबी समुद्रातील जाखाऊ बंदरापासून 280 किमी दूर आहे. गेल्या २४ तासांत वादळाचा वेग मंदावला असून तो जवळपास स्थिर आहे. गेल्या तीनपासून त्यात फारशी हालचाल झालेली नाही.चक्रीवादळानं अधिक रौद रुप धारण केलं आहे. गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ पोर्टजवळून ओलांडण्याची शक्यता आहे.

हे सुध्दा वाचा:

अमोल कोल्हेंचे भाजप प्रवेशाच्या चर्चेवर कृतीतून उत्तर; वळसे-पाटील यांच्यासोबत भीमाशंकराचे दर्शन घेत मतदारसंघाचा दौरा

ठाण्यात बेकायदा होर्डिंग्ज वाल्यांची आता खैर नाही, जीवितहानी झाल्यास मालकावर गुन्हा

येवा टोल आपलोच असा , ओसरगावमधील टोलनाक्यावरुन वाद, नेमकं काय आहे प्रकरण

चक्रीवादळाचा मुंबईला असलेला धोका सध्यातरी टळला आहे. तसेच चक्रीवादळामुळे 14 जून आणि 15 जून दरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी