27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रशिवकृपा पतपेढीवर संस्थापक सहकार परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

शिवकृपा पतपेढीवर संस्थापक सहकार परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असणाऱ्या शिवकृपा पतपेढीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत पतपेढीचे माजी अध्यक्ष अविनाश भोसले यांच्या संस्थापक सहकार परिवर्तन पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. संस्थापक सहकार पॅनलचे सर्व 13 उमेदवार पराभूत झाले असून निवडणुकीत अविनाश भोसले ठरले किंगमेकर ठरले आहेत.
अविनाश भोसले यांच्या नेतृत्वात संस्थापक सहकार परिवर्तन पॅनलने निवडणुक लढली. या निवडणुकीत चंद्रकांत वंजारी आणि नरहर देव यांची बिनविरोध निवड झाली. एकुण 13 जागांसाठी निवडणूक झाली. या सर्वच्या सर्व जागांवर संस्थापक सहकार परिवर्तन पॅनलने बाजी मारली असून विजयी उमेदवारांचे मताधिक्य जवळपास 10 हजार इतके मोठे मताधिक्य मिळाले आहे. शिवकृपा कार्यक्षेत्र संपुर्ण महाराष्ट्रात असून एकुण 100 शाखा कार्यरत आहेत. तर 4500 कोटींचा संमिश्र व्यवसाय आहे.

हे सुध्दा वाचा:

बिपरजॉय चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरुन पुढे सरकलं, गुजरातकडे कूच

अमोल कोल्हेंचे भाजप प्रवेशाच्या चर्चेवर कृतीतून उत्तर; वळसे-पाटील यांच्यासोबत भीमाशंकराचे दर्शन घेत मतदारसंघाचा दौरा

मुंबई,ठाण्यासह कोकणात पावसाच्या सरी कोसळल्या;विदर्भात पावसाची प्रतिक्षा कायम

संस्थेचे माजी अध्यक्ष अविनाश भोसले यांना तांत्रिक बाबींमुळे पदावरून दूर व्हावे लागले होते. त्यानंतर अविनाश भोसले यांनी संस्थापक सहकार परिवर्तन पॅनलची स्थापना केली. सर्व आजी माजी संचालकांना तसेच संस्थापक असलेले गोरख चव्हाण, चंद्रकांत वंजारी यांना सोबत घेऊन विजयश्री खेचुन आणला. तसेच ओमकार भोसले यांच्या विजयाने बिजवडीत आनंदाचे वातावरण आहे.

विजयी उमेदवार

कदम हिंदुराव पांडुरंग
घोरपडे विजय दादासाहेब
चव्हाण गोरख तुकाराम
चव्हाण संतोष बबनराव
देशमुख शिरीष हिंदुराव
पवार राजेंद्र विठ्ठल
भोसले ओमकार अविनाश
माने किशोर पोपट
मोहिते बाळासाहेब तुकाराम सपकाळ सुरेश दिनकर
चव्हाण पूनम गोरख
वंजारी शुभांगी दत्तात्रय
चव्हाण रमेश पांडुरंग
बिनविरोध दोन
चंद्रकांत वंजारी, नरहर देव

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी