27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रआरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा पुढाकार, वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा पुढाकार, वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

पंढरपूरकडे जाण्यासाठी राज्यभरातून वारकरी निघाले आहेत. आषाढी एकादशीला लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी राज्य सरकार घेणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 27 ते 29 जून दरम्यान हे तीन दिवशीय महाआरोग्य शिबिर मौजे वाखरी, मौजे गोपाळपुर, 65 एकर तीन रस्ता येथे होणार आहे. या शिबिरासाठी राज्यभरातून सुमारे खासगी व सरकारी असे 9 हजार डॉक्टर व निमवैद्यकीय कर्मचारी सहभागी होऊन 3 दिवस आरोग्य सेवा पुरविणार आहेत.

अंदाजे आषाढी वारीमधील ५० लक्ष भाविकांची मोफत तपासणी सोबत मोफत उपचार हे तज्ञ डॉक्टरामार्फत होणार आहेत. या महाआरोग्य शिबीरामध्ये सर्व विशेषतज्ञ सुविधा (Specially Services) पुरविण्यात येत असून यामध्ये मेडिसीन, सर्जरी, ऑर्थोपेडीक ऑन्कोलॉजी, श्रीरोगतज्ञ, बालरोग तज्ञ, न्यूरोसर्जरी, गॅस्ट्रोइट्रॉलॉजी, ऑपथलमोलॉजी (नेत्ररोग), दंत वैदयकिय, आयुष, युनानी, त्वचारोग व इतर सर्व विशेषतज्ञ सुविधा उपलब्ध होणार आहेत.

नेत्रविकार, हृदयरोग, किडनी, पोटाचे विकार, त्वचेचे विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, संसर्गजन्य रोग (वायरोग, कुष्टरोग, कॅन्सर या सारख्या रोगावर मोफत उपचार उपलब्ध होणार आहेत.) यासाठी रुग्णांची सुरवातीस तपासणी, रोग आढळून आल्यास त्वरीत उपचार, विनामुल्य औषधे, गरज असल्यास मोफत संदर्भ सेवा देऊन MPJAY / PMJAY मार्फत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. दृष्टिदोष असणान्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात येत असून, ५ लाख चष्मा मोफत वाटप उदिष्ठय ठेवण्यात आलेले आहे. त्याचसोबत मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी मोफत वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात येईल.

आषाढी वारीनिमित्त महाआरोग्य शिबीरामध्ये तपासणीकरीता येणाऱ्या सर्व रुग्णांना / भाविकांना मोफत नाष्टा, चहा, पाणी यांची सोय केली जाईल. तसेच पालखी तळावर जाऊन सर्व वारकऱ्यांना “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मार्फत मोफत तपासणी तसेच औषध वाटप करून, गरज भासल्यास मोफत संदर्भ सेवा देण्यात येईल. प्रत्येक २ कि.मी अंतरावर “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना माध्यमातून मोफत उपचारांची उपलब्ध करून देण्यात येईल.

पालखी सोहळा २०२३ सुरु झालेला असून आषाढी एकादशीला पंढरपूर येथील पांडुरंग भेटी साठी राज्यभरातून २०वक वारकरी पंढरपूर येथे दाखल होत आहेत. या आवर्तन आरोग्यसेवा सुविधा मिळण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागामार्फत खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे. दोन किलोमीटर एक आरोग्य पथक असे एकूण 127 फिरते आरोग्य पथके पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य विभागात 24 तास फिरती वैदयकीय आरोग्य पथके करण्यात आली आहे. साठी पुरते दवाखाने देखील उभारण्यात आलेले आहेत.

पालखी सोहळा २०२३ सुरु झालेला असून आषाढी एकादशीला पंढरपूर येथील पाडुरंग भेटी साठी राज्यभरातून अंदाजे सुमारे २० लाख भाविक वारकरी पंढरपूर येथे दाखल होत आहेत. या भाविकांना आरोग्य सेवा सुविधा मिळण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागामार्फत खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रत्येकी दोन किलोमीटर वरती एक आरोग्य पथक असे एकूण 127 फिरते वैद्यकीय आरोग्य पथके असतील. पालखी मार्गावर व मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्यात २४ तास फिरती वैदयकीय आरोग्य पथके तैनात करण्यात आलेली आहेत. औषधोपचारासाठी तात्पुरते दवाखाने बूध देखील उभारण्यात आले आहे.

पुणे मंडळ स्तरावरुन रुग्णवाहिका पथके

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत आळंदी ते पंढरपूर 30 रुग्णवाहिका 

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोबत 47 रुग्णवाहिका पथके

दिंडी प्रमुखाना देण्यासाठी १००० औषध किटचे वाटप

अत्यावश्यक सेवेसाठी 24×7 शासकीय (१०२) सणवाहिका पालखी मार्गावर तसेच पालखी कार्यरत आहेत. या शिवाय अत्यवस्त रुग्णसेवेसाठी 108 रुग्णवाहिका 

पालखी मार्गावरील सर्व १९२१ हॉटेल मधील कामगार व पाणी तपासणी. पालखी मार्गावर 196 टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा पालखी मार्गावरील पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्त्रोतांची तपासणी. दिंडी प्रमुखांना औषधोपचारासाठी व वैद्यकीय मदतीसाठी माहिती देऊन त्यांच्याशी समन्वय साधणे.

हे सुद्धा वाचा

झेड पी शाळेच्या मुलांचा आकर्षक गणवेशाने रुबाब वाढणार…..

धनंजय मुंडे यांचे क्रिकेटप्रेम; एमपीएलमध्ये उतरवला मराठवाड्यातील खेळाडूंचा संघ

बिपरजॉय चक्रीवादळाने घेतलं रौद्र रुप, रेड अलर्ट जारी

धूर फवारणी मुक्कामाचे ठिकाणी तीन दिवसापूर्वी व एक दिवस अगोदर. संपूर्ण पालखी मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य संदेश देणारे खास तीन संपूर्ण पालखी मार्गावर विविध ठिकाणी आरोग्यविषयी माहिती देणारी तीन पथनाट्य आरोग्य संदेश चिकित्सा व समुपदेशन. दिनांक 6 जून 2023 पासून आजपासून संपूर्ण पालखी मार्गावर शासकीय संस्थेमधून व निर्माण केलेल्या मेडिकल टीमकडून वारकरी यावर करण्यात आलेल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी