27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदे यांनी पुणेकरांची नाराजी दूर केली; आकाशवाणीचा वृत्तविभाग सुरुच राहणार

एकनाथ शिंदे यांनी पुणेकरांची नाराजी दूर केली; आकाशवाणीचा वृत्तविभाग सुरुच राहणार

कोरोना काळात उत्कृष्ठ कार्य केलेल्या पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद करण्याचे फर्मान केंद्र सरकारने काढले होते. त्यामुळे पुणेकरांमध्ये मोठी नाराजी पसरली होती. आकाशवाणी वृत्तविभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील वृत्तविभाग बंद होणार असल्याने चिंता लागून राहिली होती. पुणे आकाशवाणीचा वृत्तविभाग बंद करु नये अशी मागणी देखील अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी यात हस्तक्षेप केल्याने प्रसारभारतीने अखेर फर्मान मागे घेतले आहे.

पुणे आकाशवाणीचा वृत्तविभाग बंद करण्याचा निर्णय केंद्राकडून मागे घेण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले आहेत. आकाशवाणी पुणेचा वृत्तविभाग सुरु राहणाऱ असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे आकाशवाणीत अधिकारी नसल्याने पुणे आकाशवाणीचा वृत्तविभाग बंद करुन संभाजीनगर आकाशवाणीच्या केंद्रावरुन बातमीपत्रे प्रसारित करण्यात येणार होती. याबाबत पुणेकरांमध्ये नाराजी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत लक्ष घालावे आणि पुणे आकाशवाणीचा वृत्तविभाग बंद करु नये अशी मागणी देखील केली जात होती.

हे सुद्धा वाचा

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा पुढाकार, वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

झेड पी शाळेच्या मुलांचा आकर्षक गणवेशाने रुबाब वाढणार…..

धनंजय मुंडे यांचे क्रिकेटप्रेम; एमपीएलमध्ये उतरवला मराठवाड्यातील खेळाडूंचा संघ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी त्यांच्या अपर मुख्य सचिवांना सूचना देऊन केंद्रातील अधिकाऱ्यांकडे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरू ठेवावा, अशी विनंती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामागणीवर सकारात्मक निर्णय घेत प्रसारभारतीने यापुढे पुणे प्रादेशिक वृत्त विभागातूनच बातमीपत्र प्रसारित होतील, असे आदेश आज काढले आहेत. सकाळी ७.१०, ८ वा. ८.३०, १०.५८, ११.५८ आणि सायंकाळी ६ वाजेचे बातमीपत्र यापुढेही पुणे केंद्रावरुनच प्रसारित होणार आहेत. त्यामुळे पुणे आकाशवाणीच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी