27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रगुजरातला तडाखा दिल्यानंतर, बिपरजॉय चक्रीवादळाचे राजस्थानकडे कूच

गुजरातला तडाखा दिल्यानंतर, बिपरजॉय चक्रीवादळाचे राजस्थानकडे कूच

बिपरजॉय चक्रीवादळ हे गुजरातला धडकल्यानंतर आता ते राजस्थानच्या दिशेने पुढे सरकले आहे. चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकल्यानंतर मोठं प्रमाणात नुकसान झाले आहे. गुजरातसह राजस्थानमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. बिपरजॉय चक्रीवादळ हे 15 जून रोजी रात्री भारताच्या किनारपट्टीवर धडकलं होतं. या वादळामुळे काही लोक जखमी झाले आहेत. तेथील लोकांचे घरासोबत इतर नुकसान झालं आहे.विजेचे खांब पडून वीजपुरवठा खंडित झाला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 75 ते 85 किलोमीटर इतका आहे. गुरुवारी रात्री 11.30 च्या सुमारास गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर धडकलं. मांडवी, कच्छ, जखाऊ आणि सौराष्ट्र या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे.

बिरपजॉय चक्रीवादळामुळे आज आणि उद्या गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने सांगितले आहे. गुजरातशिवाय आणखी चार राज्यांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि नवी दिल्लीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. किनारपट्टी भागात एनडीआरएफच्या 17 आणि एसडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

हे सुध्दा वाचा :

एकनाथ शिंदे यांनी पुणेकरांची नाराजी दूर केली; आकाशवाणीचा वृत्तविभाग सुरुच राहणार

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा पुढाकार, वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

धनंजय मुंडे यांचे क्रिकेटप्रेम; एमपीएलमध्ये उतरवला मराठवाड्यातील खेळाडूंचा संघ

मानवी जिवितहानी झाली नसली तरी आत्तापर्यंत 23 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 22 लोक यामुळे जखमी झाले आहे.सध्या गुजरातमधील 900 पेक्षा अधिक घरांमध्ये वीज नसल्याची माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी