27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमनोरंजन'आदिपुरुष'चा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल, चाहत्यांकडून ढोल-ताशांच्या गजरात चित्रपटाचे स्वागत

‘आदिपुरुष’चा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल, चाहत्यांकडून ढोल-ताशांच्या गजरात चित्रपटाचे स्वागत

अभिनेत्री क्रिती सेनन आणि अभिनेता प्रभास यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे़. रामायणावर आधारित असलेल्या चित्रपटाचे दिगदर्शन मराठमोळ्या ओम राऊत याने केले आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्ऩड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 6 हजार 200 स्क्रीन्सवर 2 डी आणि 3 डी मध्ये चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल ठरला असून चित्रपटाने पहिल्याच दिवशी 100 कोटींचा टप्पा पार केल्याचा अंदाज बांधला जात आहे. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाला सिनेमा प्रेमींकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

हे सुध्दा वाचा:

बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस लांबला, राज्यात पाणी संकट येण्याची शक्यता

गुजरातला तडाखा दिल्यानंतर, बिपरजॉय चक्रीवादळाचे राजस्थानकडे कूच

एकनाथ शिंदे यांनी पुणेकरांची नाराजी दूर केली; आकाशवाणीचा वृत्तविभाग सुरुच राहणार

अनेक ठिकाणी चाहत्यांनी ढोलताशांच्या गजरात ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे स्वागत केले, तर बऱ्याच ठिकाणी हा चित्रपट शाळेतील विद्यार्थांना दाखवण्यात येत आहे. सोशल मिडियावर एक शिक्षिकेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिक्षिका हनुमानाची मूर्ती घेऊन चित्रपटगृहात एन्ट्री करत असून ती मूर्ती एका खुर्चीवर ठेवत आहे. एका चाहत्याने व्हिडीओ शेअर करत ट्वीट केल आहे, या व्हिडीओमध्ये एका चित्रपटगृहात ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी माकडाने एन्ट्री केल्याचे देखील दिसत आहे. या व्हिडिओवर ट्विट करत त्याने म्हटलं की आदिपुरुषच्या भव्य प्रकाशनासाठी हनुमानजी स्वत: आले आणि आशिर्वाद दिला.

‘आदिपुरुष’ हा रामायणावर आधारित पौराणिक चित्रपट आहे. ओम राऊत याने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये अभिनेता प्रभास रामाच्या आणि क्रिती सेनन सीता मातेच्या भूमिकेत तर सनी सिंह लक्ष्मणाच्या, सैफ अली खान रावणाच्या, मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हा हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री सोनल चौहान आणि तृप्ती तोरमलदेखील यांनी देखील चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

या चित्रपटामध्ये अजय-अतुल गोगावले, सचेत-परपंरा, संचित बलहारा आणि अंकीत बलहारा यांनी गाणी गायली आहेत. जय श्री राम, शिवोहम, प्रिया मिथुनम, हुप्पा हुय्या, राम सीता राम, ही गाणी आदिपुरुष चित्रपटामध्ये ऐकायला मिळणार आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी