29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्राईमसावित्रीबाई फुले वसतिगृहातील बलात्कार प्रकरण; नऊ दिवसांनी वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन

सावित्रीबाई फुले वसतिगृहातील बलात्कार प्रकरण; नऊ दिवसांनी वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन

सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये नऊ दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेच्या तपासासाठी स्थापन केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार या वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन करण्यात येत आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली.उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मृत विद्यार्थीनीच्या कुटूंबियांची दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून न्याय देण्याचे आश्वासन यावेळी मंत्री पाटील यांनी दिले.

मंत्री पाटील म्हणाले, या घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्याच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार वसतिगृहाच्या अधीक्षिका यांचे निलंबन करण्यात येत आहे.
यावेळी मंत्री पाटील यांनी कुटूंबियांना तपासाची सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांना मदत म्हणून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच कुटुंबीयांनी खचून जाऊ नये, त्यांना मदत व्हावी म्हणून त्यांच्या मुलाला कंत्राटी पद्धतीने तात्पुरती नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

हे सुद्धा वाचा

शेलार साहेब शांत व्हा, मानसिक संतुलन ढळू देऊ नका! सावरकरप्रकरणी भाजपा-कॉंग्रेसमध्ये ट्विटर युद्ध

आदरणीय रामदास आठवले साहेब तुम्ही इतंक कसं काय सोडून दिले हो ?

पाठ्यक्रमातून काढाल, पण सावरकर, डॉ. हेडगेवार लोकांच्या मनातून कसे काढाल; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा सखोल आढावा घेऊन महिला सुरक्षा रक्षक देण्यात येईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले. रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर, मृत विद्यार्थीनीचे नातेवाईक उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी