27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रसंत निवृत्तीनाथांची पालखी श्रीगोंद्यात दाखल; संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा...

संत निवृत्तीनाथांची पालखी श्रीगोंद्यात दाखल; संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा पडणार पार

संत निवृत्तीनाथांची पालखी 15 दिवसांचा प्रवास करत आज श्रीगोंदा मध्ये दाखल झाली आहे. भजन, कीर्तन, आणि अभंगामध्ये दंग असलेले वारकरी ऊन-पाऊस यांचा मारा सहन करत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात दाखल झाले आहेत. काल जामखेड तालुक्यातील साकत येथील मुक्कामानंतर पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. आज निवृत्तीनाथांची पालखी श्रीगोंदा तालुक्यातुन पुढे मार्गस्थ करत वाटेफळ गावातून पुढे जात रुई, अंबिलवाडी, बनपिंपरी मार्ग घोगरगाव येथे मुक्कामाला जाणार आहे. तर दुसरीकडे संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा आज दुसरा रिंगण सोहळा पार पडणार आहे. रायमोह येथील मुक्काम करून पालखीने पुढील मुक्कामासाठी प्रस्थान केले. 425 वर्ष परंपरा असलेल्या हटकरवाडी या पंचक्रोशीत सकाळी दहा वाजता पालखी दाखल झाली. या वेळी पालखीसोहळ्यातील वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले व गावकऱ्यांकडून निवृत्तीनाथांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले.

हे सुध्दा वाचा:

हवामानातील बदलामुळे पाऊस लांबणीवर 23 जूननंतर पावसाची शक्यता; शेतकरी राजा चिंतेत

सावित्रीबाई फुले वसतिगृहातील बलात्कार प्रकरण; नऊ दिवसांनी वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन

शेलार साहेब शांत व्हा, मानसिक संतुलन ढळू देऊ नका! सावरकरप्रकरणी भाजपा-कॉंग्रेसमध्ये ट्विटर युद्ध

बीड जिल्ह्यातील हटकरवाडी येथील प्रथेप्रमाणे विना बैलाच्या बैलगाडीत पालखीने अवघड डोंगरमाथा पार केला हटकरवाडी पासून पुढील पाच किलोमीटरचा प्रवास हा पालखीसाठी सर्वात अवघड समाजाला जातो. दरवर्षी हजारो स्थानिक पालखी ओढण्यासाठी हजर असतात. तसेच यावेळी सर्व नाथ भक्तांनी प्रथेप्रमाणे एक दिवस उपवास ठेवला होता. यानंतर पुढील मुक्कामासाठी पालखी तांबा राजुरी मार्ग पाटोदा येथे मार्गस्थ झाली आहे. या दरम्यान पालखी सोहळ्याचा दुसरा रिंगण प्रथेप्रमाणे घुमरे पारगाव येथे पार पडणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी काल बीड शहरात मुक्कामासाठी होती. आज पालखी बीड शहरातील बालाजी मंदिरामध्ये विसाव्यासाठी थांबणार आहे. बीड वासियांकडून वारकऱ्यांच्या दुपारच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. तसेच आज संध्याकाळी बीड शहरातील बालाजी मंदिराध्ये समाधान महाराज शर्मा यांचे किर्तन होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी