29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर शाईफेक करून हल्ला

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर शाईफेक करून हल्ला

अयोध्या पौळ या राज्यातील सत्तसंघर्षानंतर प्रसिद्धी झोतात आलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी. शुक्रवारी ( १६ जून ) रात्री कळवा येथील एका कार्यक्रमात त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. तसेच त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. कळवामधील मनिषानगर भागात ही घटना घडली आहे. अयोध्या पौळ यांनी या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.सोशल मीडियावर मी सतत ठाकरे गटाची बाजू मांडत असते. म्हणूनच मला टार्गेट करण्यात आलं. असा हल्ला झाला म्हणून मी घाबरणार नाही. मी माझे काम करतच राहणार, असे पौळ यांनी सांगितलं. दरम्यान, शिवसेना ( ठाकरे गट ) ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी ठाणे पोलिसांकडे केली आहे.

कळवा मनीषानगर येथील जय भीमनगर भागात अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सर्व महापुरुषांच्या फोटोला हार घालत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला शेवटी हार का घातला म्हणून स्थानिक महिलांनी पौळ यांच्यावर शाई फेकली. त्यानंतर त्यांना मारहाण करत अंगावर मोठ्या संख्येने जमाव धावून आल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा ठाकरे गटाचा कार्यक्रम म्हणून मला निमंत्रण देण्यात आले होते.
निमंत्रणानुसार त्या कार्यक्रमाला गेल्या. मला तेथे माझ्या ओळखीचं कोणचं दिसलं नाही. तेथे शंभर दीडशे महिला होत्या. चार मुलं होती. मला थोडा संशय आला. मी तेथून जाण्याचा प्रयत्न केला. पण ते मला म्हणाले की आता तुम्ही महापुरुषांच्या कार्यक्रमात आलाय, मग तसेच जाणार का? मी म्हटलं नाही, आता आले तर महापुरुषांना अभिवादन करून जाणार, असे पौळ यांनी तेथील उपस्थितांना सांगितले. त्यानुसार आधी छत्रपती शिवाजी महाराज, नंतर अहिल्यादेवी होळकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण केल्यावर काही जणानी त्यावर आक्षेप घेतला. मी क्रमवारीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसबीरीला पुष्पहार अर्पण केला. त्यात महापुरुषाचा अवमान करण्याचा हेतु नव्हता.

हे सुध्दा वाचा :

संत निवृत्तीनाथांची पालखी श्रीगोंद्यात दाखल; संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा पडणार पार

हवामानातील बदलामुळे पाऊस लांबणीवर 23 जूननंतर पावसाची शक्यता; शेतकरी राजा चिंतेत

सावित्रीबाई फुले वसतिगृहातील बलात्कार प्रकरण; नऊ दिवसांनी वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन

देश संविधानावर चालतो. माझ्या देशाचे संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही. म्हणून होत असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधान विरोधकांशी आहे. आणि मी ती लढेल. आज माझा शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार आणि लाखो शिवसैनिक माझ्या सोबत आहे. फसवणूक करून मला कार्यक्रमाला बोलावून माझ्यावर शाईफेक करण्यात आली. मारहाण करण्यात आली. त्यांनी कट रचून हे सर्व करण्यात आलं. सोशल मीडियावर मी सतत ठाकरे गटाची बाजू मांडत असते. म्हणूनच मला टार्गेट करण्यात आलं. असा हल्ला झाला म्हणून मी घाबरणार नाही. मी माझे काम करतच राहणार, असे पौळ यांनी सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी